उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी युपी में का बा? हे गाणं चांगलंच लोकप्रिय झालं होतं. या गाण्याचा प्रभाव एवढा वाढला की मोदी सरकारलाही या गाण्याची दखल घ्यावी लागली होती. त्यानंतर भाजपाचे माजी खासदार रवि किशन यांनीही याच चालीवर भाजपाचं प्रमोशन करणारं एक गाणं तयार केलं होतं. आता याच नेहा सिंह राठोडला उत्तर प्रदेश पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कानपूरमध्ये बुलडोझर कारवाईत दोन महिलांचा मृत्यू झाला., या विषयावर बनवण्यात आलेल्या गाण्या प्रकरणी पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की का बा सिझन २ या गाण्याचा व्हिडिओ समाजात द्वेष आणि तणाव पसरवण्याचं काम करतो आहे.

नेहा सिंह राठोडने या पोलिसांनी नोटीस दिल्याचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. तुम्हाला हे सर्व कुणी करण्यास सांगितलं? असा प्रश्न तिने पोलिसांना विचारला. एक लोककला सादर करणाऱ्या गायिकेच्या आवाजाला भाजपा एवढी का घाबरते? असा सवाल समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या कारवाईनंतर उपस्थित केला.

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी
Yogi Aadityanath talk about law and order situation
“…अशा लोकांचे ‘राम नाम सत्य’ करतो”, योगी आदित्यनाथ यांनी कुणाला दिला सज्जड इशारा?
bchchu kad
“आमची लढाई हुकूमशाहीविरोधात”, बच्चू कडूंचा नवनीत राणा आणि भाजपाला टोला; म्हणाले, “त्यांची बनवाबनवी…”

२०२० च्या बिहार निवडणुकीच्या दरम्यान बिहारमें का बा या गाण्याने ती प्रसिद्धीत आली. त्यानंतर तिचं युपी मे का बा हे गाणं आलं. जे चांगलंच हिट झालं. तिची आत्तापर्यंत २०० गाणी प्रसिद्ध झाली आहेत. ज्यामध्ये बेरोजगारी, मजूर, शेतकरी, लॉकडाऊन, स्थलांतरीत मजूर या विषयांवर तिने गाणी म्हटली आहेत. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशच्या निवडणुका झाल्या त्यात युपी मे का बा हे गाणं प्रसिद्ध झालं होतं. याला उत्तर देणारं गाणं रवि किशन यांनी प्रसिद्ध केलं होतं जे युपी में सब बा असं होतं. लखीमपूर खेरीमधली शेतकऱ्यांचा मृत्यू, कोविडच्या लाटेत गंगेत सापडलेले मृतदेह या विषयांवर भाष्य करणारीही तिची गाणी आली आहेत.

कोण आहे नेहा सिंह?

बिहारच्या कैमूर जिल्ह्यात राहणाऱ्या नेहा सिंह राठोडचा जन्म १९९७ मध्ये झाला होता. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दरम्यान नेहाचं यु. पी. मे का बा? हे गाणं चांगलंच प्रसिद्ध झालं होतं. यानंतर नेहाने याच गाण्याचे दोन पार्ट तयार केले होते. बिहारमध्ये जन्मलेल्या नेहाने तिचं शिक्षण बिहारमध्येच घेतलं आहे. तसंच कानपूर विद्यापीठातून तिने पदवी घेतली आहे. २०१८ मध्ये तिने गायिका म्हणून आपल्या लोकगीत गाण्याच्या कलेला सुरूवात केली. सामाजिक विषयांवर गाणारी गायिका म्हणून नेहा सिंह अल्पावधीत लोकप्रिय झाली. ब्लाऊज हुक आणि लेहंगा स्ट्रिंग या प्रकारातून भोजपुरी गाणी बाहेर काढणं तिला आवश्यक वाटतं. तसंच चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी ती घरापासून दूर वाराणसीत एका हॉस्टेलमध्येही राहिली होती. बिहारच्या खेड्यात मुलींचं काही चालत नाही. त्यांना बोलण्याची इच्छा असते पण बोलू दिलं जात नाही ऐकून घेतलं जात नाही. मला हा दृष्टीकोन बदलायचा होता म्हणून मी गाणं शिकले असंही नेहाने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

आमच्या कुटुंबात अशी पद्धत आहे की शालेय शिक्षण झाल्यावर मुलांना कोचिंग किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात पाठवलं जातं. तर मुलींची लग्न लावण्यात येतात. माझ्या १९ वर्षीय बहिणीचं लग्न झालं आहे. मी हुशार होते म्हणून मी पदवीपर्यंत शिकले. त्यानंतर बी. एड. करा चांगला नवरा मिळेल याची वाट बघा हे सगळं पुढे होतंच. पण हा माझा मार्ग नाही हे मला माहित होतं म्हणून मी गाण्याकडे वळले असंही नेहा सिंह सांगते.