बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एनडीएत दाखल झाले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये आपल्याला २०१९ प्रमाणेच यश मिळेल, अशी अपेक्षा भाजपाला आहे. मात्र, भाजपाने नितीश कुमार यांना एनडीएत का घेतले, याची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामागचे उत्तर २०१९ च्या लोकसभा आणि २०२१ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारीमध्ये असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

२०१९ च्या निवडणुकीत एनडीएने बिहारमधील ४० पैकी ३९ जागांवर विजय मिळविला होता; तर उर्वरित एक जागा काँग्रेसने जिंकली होती. या निवडणुकीत भाजपाने व जेडीयू यांनी प्रत्येकी १७; तर एलजेपीने सहा जागांवर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत एनडीएला जवळपास ५४.३४ टक्के मते मिळाली होती. तसेच भाजपाने १७, तर एलजेपीने सहा जागांवर विजय मिळविला होता. तर, जेडीयूला १७ पैकी १६ जागांवर विजय मिळविता आला होता.

kangana Ranaut and simranjit singh mann
Kangana Ranaut : “कंगना रणौत यांना बलात्काराचा खूप अनुभव”, माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
Rohit Pawar Nitin Gadkari
रोहित पवारांनी घेतली गडकरींची भेट, राजकीय वर्तुळात चर्चा
Aaditya Thackeray
Aditya Thackeray : “बलात्काऱ्यांना दहशतवाद्यांसारखं वागवलं पाहिजे”; बदलापूर प्रकरणावर आदित्य ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया; राष्ट्रपतींकडे केली ‘ही’ मागणी
Ajit Pawar avoid criticizing Sharad Pawar
लोकसभेत फटका बसल्यानेच शरद पवारांवर टीकाटिप्पणी अजित पवारांनी टाळली
Kolkata doctor rape murder case
Mamata Banerjee : कोलकाता बलात्कार प्रकरणी ममता बॅनर्जींचा पोलिसांना अल्टीमेटम; म्हणाल्या, “रविवारपर्यंत प्रकरण निकाली काढा, अन्यथा…”

हेही वाचा – अरविंद केजरीवाल : भाजपाचा अचूक लक्ष्यभेद की, ‘अति’ ची माती?

आरजेडीच्या नेतृत्वातील महाआघाडीला मात्र या निवडणुकीत संघर्ष करावा लागला होता. या महाआघाडीमध्ये आरजेडीबरोबरच काँग्रेस, हिंदुस्थानी अवामी मोर्चा (सेक्युलर), राष्ट्रीय लोक मोर्चा (RLM) व अन्य एका लहान पक्षाचा समावेश होता. या सर्वांना मिळून केवळ ३१.२३ टक्के मते मिळाली होती; तर काँग्रेसच्या रूपाने त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळवता आला होता. काँग्रेसने या निवडणुकीत नऊ जागांवर; तर आरजेडीने १९ जागांवर निवडणूक लढवली होती. त्यामध्ये आरजेडीला १५.६८ टक्के, तर भाजपाला २४.०६ टक्के व जेडीयूला २२.२६ टक्के मते मिळाली होती.

२०२४ ची परिस्थिती काय?

२०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एनडीएमध्ये आता तीनपेक्षा जास्त म्हणजे भाजपा, जेडीयूसह हिंदुस्तानी आवाम मोर्चा, तसेच उपेंद्र कुशवाह यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा या पक्षांचा समावेश आहे. सोमवारी जाहीर झालेल्या जागावाटपानुसार भाजपा पुन्हा १७ जागा; तर जेडीयू १६ व एलजेपी पाच जागांवर निवडणूक लढविणार आहे. जेडीयू व एलजेपी प्रत्येकी एक जागा कमी लढविणार आहे. या दोन जागा इतर दोन मित्रपक्षांना देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे आरजेडी, काँग्रेस व डाव्या पक्षांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीने अद्याप तरी जागावाटपाची घोषणा केलेली नाही.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीची आकडेवारी काय सांगते?

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूने स्वबळावर ३८ जागा लढविल्या होत्या. मात्र, त्यांना केवळ दोन जागांवर विजय मिळविता आला होता. या निडवणुकीत त्यांना १६.०४ टक्के मते मिळाली होती. तसेच या निवडणुकीत एनडीएने ३१ जागांवर विजय मिळविला होता. त्यांना ३९.४१ टक्के मते मिळाली होती. तर, आरजेडी आणि काँग्रेसच्या आघाडीला ३०.२४ टक्के मते मिळून केवळ सात जागांवर विजय मिळविता आला होता.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील यशानंतर एका वर्षाने झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र एनडीएला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला होता. २०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला २४३ पैकी केवळ १२५ जागा जिंकता आल्या. त्यामध्ये भाजपा, जेडीयू व एलजेपी या पक्षांचा समावेश होता. सर्व पक्षांना मिळून केवळ ३७.२६ टक्के मते मिळाली होती. या निवडणुकीत भाजपाने ७४; तर जेडीयूने ४३ जागांवर विजय मिळविला होता. मात्र, तरीही भाजपाने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले.

हेही वाचा – टीका करणाऱ्यालाच काँग्रेसचे तिकीट, उमेदवारीवरून वाद; शशी थरूर म्हणाले…

पुढे दोन वर्षांनंतर म्हणजे २०२१ मध्ये नितीश कुमार यांनी एनडीएची साथ सोडत महाआघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तसेच आरजेडीबरोबर सत्ता स्थापन करीत पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशात आता नितीशकुमार यांनी पुन्हा एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा फटका इंडिया आघाडीला बसण्याची शक्यता आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाला लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बघितल्यास, महाआघाडी एनडीएपेक्षा केवळ १० जागांवर पुढे जाते. मात्र, त्यात जर जेडीयूची मते जोडली, तर महाआघाडी जवळपास २४ च्या पुढे जाऊ शकते.