अकोला : अकोल्यात भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत असली तरी अद्याप उमेदवाराच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. प्रकृतीच्या कारणामुळे माजी राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे निवडणुकीपासून दूर राहतील. त्यामुळे भाजपला नवा उमेदवार द्यावा लागेल. पक्षात अनेक जण इच्छूक असून त्यांच्याकडून उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. मतदारसंघाबाहेरील देखील काहींची अकोल्यातून लढण्याची तयारी आहे. भाजपच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पक्ष धक्कातंत्राचा वापर करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले. निवडणुकीच्या तयारीत नेहमीप्रमाणे भाजपने आघाडी घेतली असून त्यांच्या तोडीसतोड वंचितने देखील बांधणीवर भर दिला आहे. २००४ पासून सलग चार लोकसभा निवडणुका जिंकून खासदार संजय धोत्रे यांनी अकोला मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व राखले. भाजप, काँग्रेस व वंचित आघाडीत झालेल्या तिरंगी लढतीमध्ये भाजपला थेट लाभ झाल्याचा अकोल्याचा इतिहास आहे. लोकसभा निवडणूक लढण्याच्या व उमेदवारीच्या घोषणेमध्ये वंचितने आघाडी घेतली. परंपरागत अकोला मतदारसंघातून ॲड. प्रकाश आंबेडकर स्वत: निवडणूक उतरणार असल्याने वंचितची गेल्या सहा महिन्यांपासून तळागाळातून तयारी सुरू केली आहे.

What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
Congress fields Abhay Patil from Akola LS seat
अकोला : कोट्यवधींची मालमत्ता अन डोक्यावर कोट्यवधींचे कर्ज; काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील यांच्याकडे…
prakash ambedkar, bjp candidate anup dhotre
ॲड. प्रकाश आंबेडकरांपुढे खासदार धोत्रे यांच्या पुत्राचे आव्हान
akola, political parties, kunbi caste, majority voters, lok sabha 2024, bjp, vanchit bahujan aghadi, maharashtra politics,
अकोला लोकसभा मतदारसंघात गठ्ठा मतपेढीवर लक्ष, कुणबी समाज केंद्रस्थानी; राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी

हेही वाचा : मनोहर जोशी : सारीच सर्वोच्च पदे भूषविण्याची संधी मिळालेले नेते

पश्चिम विदर्भातील अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. विभागात भाजपचे अकोल्यातून संजय धोत्रे एकमेव खासदार आहेत. गेल्या साडेतीन दशकांपासून लोकसभेच्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता भाजपने आपला दबदबा राखला. तिरंगी लढतीत खा.संजय धोत्रे नेहमीच वरचढ ठरले. प्रकृती अस्वास्थामुळे सध्या ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. परिणामी, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल. लोकसभेची उमेदवारी धोत्रे कुटुंबात दिली जाते की इतर दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जातो, यावरून पक्षात काथ्थाकूट सुरू आहे. लोकसभा प्रमुख पदाची जबाबदारी अनुप धोत्रे यांच्यावर आहे. वडिलांचा वारसा पुढे चालवण्यासाठी ते इच्छूक आहेत. महिला उमेदवार म्हणून सुहासिनी धोत्रे यांचे नाव देखील समोर येऊ शकते. भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. मात्र, लोकसभेऐवजी विधानसभेतच राहण्याकडे त्याचा स्वत:चा कल असल्याचे कळते. वरिष्ठांचा आदेश आल्यास ते लोकसभेच्या रिंगणात दिसू शकतात. माजी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी लोकसभेच्या दृष्टीने मतदारसंघात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले डॉ. रणजीत पाटील यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी आमदार तथा कुणबी समाजाचे नेते नारायणराव गव्हाणकर हे देखील लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असून नागपूरकर वरिष्ठ नेत्यांमार्फत उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील आहेत. ओबीसी मोर्चाचे अकोला लोकसभा संयोजक विशाल गणगणे यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली. मुंबई व दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यावर त्यांचा भर आहे. लोकसभेच्या इच्छुकांच्या यादीत पक्षातील आणखी तीन ते चार पदाधिकारी व एका कंत्राटदाराचा सुद्धा समावेश आहे. मतदारसंघातील जातीय राजकारण व निवडणुकीतील समीकरण लक्षात घेऊन भाजपतील वरिष्ठ उमेदवाराच्या नावावर अंतिम मोहर उमटविण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : अखिलेश यादव मुस्लीम शब्द का उच्चारत नाहीत? असा सवाल करत सपा नेत्याचा राजीनामा 

वरिष्ठांच्या आढाव्यानंतर निर्णय?

भाजपचे वरिष्ठ नेते तथा गृहमंत्री अमित शहा यांचा अकोला दौरा स्थगित झाल्यानंतर आता ते किंवा दिल्लीतील इतर वरिष्ठ नेतृत्व मार्च महिन्याच्या सुरुवातीला मतदारसंघात येऊन आढावा घेण्याची शक्यता आहे. त्यानंतरच उमेदवारीवर अंतिम निर्णय होण्याची पक्षांतर्गत चर्चा आहे. यापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. जे.पी. नड्डा यांचा देखील गेल्या वर्षी जून महिन्यातील अकोला दौरा रद्द झाला होता.

हेही वाचा : Rajyasabha Election : कर्नाटकात कुपेंद्र रेड्डी निवडणूक रिंगणात; क्रॉस व्होटिंगची शक्यता; काँग्रेसपुढे मोठे आव्हान

‘मविआ’ व वंचितच्या भूमिकेकडे लक्ष

भाजप नेतृत्वाचे ‘मविआ’ व वंचितच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. अकोला मतदारसंघात तिरंगी लढत नेहमीच भाजपच्या पथ्थ्यावर पडली. ‘मविआ’ व वंचितमध्ये एकत्र येण्याची चर्चा झाली असली तरी किमान समान कार्यक्रमावर घोडे अडले आहे. जागा वाटपावर बोलणी झाली नाही. त्यांच्या निर्णयावर भाजपचे गणित अवलंबून राहील.