आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील हे राज्यात दाखल होत आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगताप यांना हटविण्यात आल्यानंतर प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नाना पटोले कायम राहतात की त्यांचा पुढील क्रमांक लागतो याची पक्षात चर्चा सुरू झाली आहे.

राज्यात काँग्रेसची एकेकाळी मजबूत ताकद होती. पण २०१४ पासून राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू झाली. २०१९ मध्ये तर काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. लोकसभेत कसाबसा एक खासदार आणि ४४ आमदार निवडून आले होते. गेल्या चार वर्षांत पक्ष वाढीसाठी फार काही प्रयत्न झाले नाहीत. आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकी स्वबळावर की महाविकास आघाडीतून लढवायच्या याबाबतही पक्षात एकमत होत नाही. स्वबळावर लढण्याची तेवढी ताकद राहिलेली नाही आणि महाविकास आघाडीत लढायचे म्हटल्यास फार कमी जागा वाट्याला येऊ शकतात. या तिढ्यातून पक्ष अद्यापही बाहेर पडलेला नाही.

Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
Congress, Nana Patole car accident,
“विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का?”, नाना पटोलेंच्या अपघातावरून काँग्रेसचा सवाल
Former Congress MLA Namdev Usendi resigned alleging that money was the criterion for ticket distribution in Congress
काँग्रेसमध्ये तिकीट वाटपासाठी पैशांचा निकष, गंभीर आरोप करून काँग्रेसचे माजी आमदार उसेंडी यांचा राजीनामा
Buldhana constituency, seat demand, local Congress Bearers, resign, met nana patole, nagpur, maha vikas aghadi, lok sabha 2024, maharashtra politics, marathi news,
काँग्रेसच्या ‘राजीनामावीरां’नी गाठले नागपूर! प्रांताध्यक्षसोबत चर्चा ; पटोले म्हणाले, गडबड करू नका…

हेही वाचा – भाजपाच्या २२० महिन्यांच्या सत्तेत २२५ घोटाळे झाले; प्रियंका गांधींची टीका, मध्य प्रदेश निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात

महाविकास आघाडीबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे मावळते अध्यक्ष भाई जगताप यांची विरोधी भूमिका आहे. नाना पटोले हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अंगावर जातात. महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांनी एकत्रित लढायचे असल्यास नाना पटोले यांचा अडसर असल्याचे काँग्रेस नेत्यांनी दिल्लीच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच राष्ट्रवादीचाही पटोले यांना विरोध आहे.

हेही वाचा – लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले ब्रिजभूषण सिंह लोकसभा निवडणूक लढवणार का? भर सभेत केले जाहीर; म्हणाले “मी…”

गेल्याच आठवड्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांची दिल्लीत भेट घेतली. कदाचित अशोकरावांकडे पुन्हा अध्यक्षपद सोपविले जाऊ शकते. मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षपद त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर अशोकरावांच्या नावाचा प्रदेशाध्यक्षपदी विचार होऊ शकतो. अर्थात, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये आपणच प्रदेशाध्यपदी कायम राहणार असल्याचे नाना पटोले यांनी जाहीर केले आहे. पटोले यांचे राहुल गांधी यांच्याशी चांगले संबंध आहेत. यामुळेच राहुल गांधी कोणता निर्णय घेतात यावर राज्य काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचे भवितव्य ठरणार आहे.