News Flash

पुण्यात अज्ञात महिलेनं १० दिवसांच्या बाळाला आईच्या हातून पळवलं

खडकी पोलिसांत तक्रार दाखल

सोलापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनर गाडीने कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

पुण्यातील औंध परिसरात आईच्या हातातून दहा दिवसांचे बाळ हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली. दापोडीतील महिला तिच्या दहा दिवसांच्या बाळाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आली होती. उपचारानंतर घरी परतत असताना हा प्रकार घडला. याप्रकरणी खडकी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा खान (वय २६ रा. दापोडी) या महिलेसोबत हा प्रकार घडला. बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास  रेश्मा तिच्या १० महिन्यांच्या बाळाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात घेऊन आली होती. दुपारी १२ वाजता रुग्णालयातून बाहेर आल्यानतंर घरी जाण्यासाठी ती  एका रिक्षामध्ये बसली. रेश्मा खान ज्या रिक्षात बसली त्याच रिक्षात पूर्वीपासूनच एक महिला बसली होती. रिक्षा काही अंतरावर गेल्यानंतर रिक्षात बसलेल्या त्या अज्ञात महिलेने रेश्माला धक्का देत तिच्या मांडीवरुन बाळाला हिसकावून घेऊन पळ काढला. या घटनेचा रेश्माला चांगलाच धक्का बसला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने बाळाला पळवून नेणाऱ्या अज्ञात महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 3:15 pm

Web Title: 10 days old child theft by unknown women in pune
Next Stories
1 Video : ‘तिरंगी’ धबधबा तुम्ही पाहिलात का?
2 स्वातंत्र्यदिनी सामाजिक बांधिलकी जपणारी ‘आर्मी’
3 पुण्यात स्वातंत्र्यदिनी सुकाणू समितीचे आंदोलन
Just Now!
X