पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १३७ रुग्ण आढळून आले. त्यामुळे शहरातील एकूण संख्या १ लाख ६४ हजार ८७९ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर ४ हजार ३८९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

करोनावर उपचार घेणार्‍या २२१ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५६ हजार ३६१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९३ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला. तर ८८ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८९ हजार ६९३ वर पोहचली असून यांपैकी, ८६ हजार ६१७ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६११ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.