News Flash

दापोडीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून

संशयित वडील फरार भोसरी पोलीस घेत आहेत शोध

(संग्रहित छायाचित्र)

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दापोडी येथे एका १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी साडेआठ च्या सुमारास उघडकीस आली. तिच्या सोबत काही अघटित घडलं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालात ते स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी संशयित सावत्र बाप (वडील) फरार आहे. त्याचा शोध भोसरी पोलिस घेत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी दापोडी येथील परिसरात राहते. आई, बहीण आणि सावत्र वडील अस तीचे कुटुंब होतं. बहीण शाळेतून आली तेव्हा घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. बहिणीने इतरांना फोन करून चावीची विचारणा केली. त्यानंतर मात्र कुलूप तोडले, त्यानंतर धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह घरात आढळला, तिचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा संशय भोसरी पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटने प्रकरणी सावत्र बाप मात्र फरार आहे. त्यामुळे भोसरी पोलिसांचा सावत्र बापावर संशय बळावला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 11:59 pm

Web Title: 14 year old minor girl strangled to death in dapodi abn 97
Next Stories
1 सामान्यांना रडवणारा कांदा पिंपरीत ८० पैसे किलो, हे आहे कारण!
2 ‘फिरोदिया’च्या विषय निवडीवरील निर्बंधांबाबत संमिश्र प्रतिक्रिया
3 फिरोदिया करंडक स्पर्धेत विषय निवडीवर निर्बंध
Just Now!
X