06 March 2021

News Flash

पुण्यात एकाच दिवसात २७९ नवे करोना रुग्ण तर पिंपरीत १३२ नवे रुग्ण

पुण्यात आठ तर पिंपरीत सहा जणांचा मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात दिवसभरात २७९ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७२ हजार ५५९ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५१० मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान २२० जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ६२ हजार ९७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १३२ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून १५१ जण करोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९३ हजार ६४७ वर पोहचली असून पैकी ८९ हजार ८९८ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ९९७ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 9:22 pm

Web Title: 279 new corona cases in pune and 132 cases in pimpris scj 81 svk 88 kjp 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पिंपरीत भारत बंद ला संमिश्र प्रतिसाद
2 कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करताना आंदोलकांना लाल बहादूर शास्त्रींच्या फोटोचा विसर
3 पुण्यात कोयत्याने केक कापून तरुण फरार; पोलिसांनी मित्राला ठोकल्या बेड्या
Just Now!
X