सेंटर फॉर प्रमोशन ऑफ डेमोक्रसी अॅन्ड सेक्युलॅरिझम आणि मुंबई विद्यापाठीचे राजीव गांधी सेंटर फॉर कंटेम्पररी स्टडीज यांच्यातर्फे विळख्यात सापडलेली धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिरपेक्षता समाजात रुजविण्यासाठी गुरुवारपासून (१८ डिसेंबर) तीन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठातील फिरोजशहा मेहता भवन येथे गुरुवारी सकाळी दहा वाजता चित्रपट निर्माते महेश भट यांच्या हस्ते या चर्चासत्राचे उद्घाटन होणार असून दिल्लीच्या सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलिपग सोसायटीजचे प्रा. राजीव भार्गव यांचे बीजभाषण होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. राम पुनियानी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. शनिवारी (२० डिसेंबर) साहित्य अकादमी पुरस्कारविजेते ज्येष्ठ कवी-गीतकार निदा फाजली यांचा सत्कार करण्यात येणार आहे. ऑल इंडिया सेक्युलर फोरम अॅन्ड सिनियर जर्नालिस्टचे निमंत्रक एस. एस. हरदेनिया आणि दिल्लीच्या सेंटर फॉर इक्विटी स्टडीजचे संचालक हर्ष मंदेर या वेळी उपस्थित राहणार आहेत. देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या ५० शोधनिबंधांचे चर्चासत्रात वाचन होणार असल्याची माहिती प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी दिली.