News Flash

द्रुतगती महामार्गावर कार-जीप अपघातात तीन महिलांचा मृत्यू; २१ जण जखमी

पिकअप जीपला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारची धडक बसून झालेल्या गंभीर अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर, २१ जण जखमी झाले.

| November 6, 2013 02:46 am

पिकअप जीपला पाठीमागून भरधाव येणाऱ्या कारची धडक बसून झालेल्या गंभीर अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला. तर, २१ जण जखमी झाले. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर कुसगावच्या हद्दीत सोमवारी (४ नोव्हेंबर) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे राऊतवाडी परिसरावर शोककळा पसरली.
सुमन मारुती राऊत (वय ५०), शीलाबाई दत्ता दळवी (वय ३५), गिरिजाबाई किसन राऊत (वय ४५, सर्व रा. राऊतवाडी, करूंज, पवनानगर, ता. मावळ) अशी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तीन महिलांची नावे आहेत. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या शांताबाई धोंडू राऊत (वय ६०), कांताबाई हनुमंत राऊत (वय ५८), कलाबाई रामू घारे (वय ५६) यांची प्रकृती चिंताजनक आहे.
द्वारका रमेश राऊत (वय ३५), सुमन किसन राऊत (वय ३५), पप्पू दामू राऊत (वय ३०), दामू नथू राऊत (वय ५२), मारुती लक्ष्मण राऊत (वय ५५), कांताबाई ईश्वर राऊत (वय ५२), सरूबाई दशरथ राऊत (वय ६५), वेणूबाई यशवंत राऊत (वय ४५), संगीता रोहिदास राऊत (वय ३५), ताराबाई हरीभाऊ राऊत (वय ६५), रखमाबाई गोपीनाथ राऊत (वय ६३), हौसाबाई मारुता राऊत (वय ६२), दत्तू नथू राऊत (वय ४८), अनिता बाळू ठाकर (वय ३५), मुक्ताबाई नामदेव राऊत (वय ४८), सुमन दामू राऊत (वय ३६), भागाबाई नामदेव राऊत (वय ६०) आणि लक्ष्मीबाई राहुल काळे (वय ३८, सर्व रा. राऊतवाडी) हे या अपघातामध्ये जखमी झाले आहेत. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2013 2:46 am

Web Title: 3 women died and 21 injured in accident on pune bombay exp way
Next Stories
1 पिंपरीतील शिवसेना नगरसेविका बनली लेखिका –
2 सांस्कृतिकमंत्री संजय देवताळे यांना ‘सलाम पुणे’ पुरस्कार जाहीर
3 फटाक्यांचा बार यंदा ‘फुसकाच’ – विक्रीमध्ये लक्षणीय घट
Just Now!
X