पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने ३२१ रुग्ण आढळल्याने १ लाख ५९ हजार ७७ एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात २० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर ४ हजार ८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ७३० रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ४७ हजार ६४२ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १८३ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, २०५ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ८६ हजार ४६४ वर पोहचली असून पैकी ८२ हजार ७१५ जण करोनातून बरे झाले आहेत. महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार २८६ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.