27 January 2021

News Flash

पुण्यात एकाच दिवसात ३५१ नवे करोना रुग्ण, पिंपरीत १७२ नवे रुग्ण

पुण्यात चार तर पिंपरीत सहा रुग्णांचा करोनामुळे मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात दिवसभरात ३५१ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७१ हजार ७६९ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान चार रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ४८६ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ४२३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज अखेर १ लाख ६१ हजार ९७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १७२ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ८२ जण करोनामुक्त झाले आहेत. तर आज दिवसभरात सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९३ हजार २५५ वर पोहचली असून पैकी ८९ हजार ५९३ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ८९९ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 5, 2020 9:11 pm

Web Title: 351 new corona patients in a single day in pune 172 new patients in pimpri scj 81
टॅग Coronavirus
Next Stories
1 सुनेच्या हत्येची दिली सुपारी, पण गेला स्वतःचाच जीव; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना
2 Maharashtra MLC election results 2020 analysis : थेट लढतीत भाजपचे नुकसान 
3 पुण्यात २४ तासात ३६६ नवे करोना रुग्ण तर पिंपरीत १४९ रुग्ण
Just Now!
X