09 March 2021

News Flash

कोथरूड येथे भरधाव टेम्पोची आठ वाहनांना धडक, पुण्यात दिवसभरातील दुसरी घटना

पुण्यात वडगाव धायरी येथील नवले पुलाजवळ सकाळीच एका ट्रकने आठ वाहनांना धडक देऊन १२ जणांना जखमी केले होते. त्यानंतर हा दुसरा अपघात घडला आहे.

पुणे : कोथरुडमध्ये एका मिनी टेम्पोने सोमवारी आठ वाहनांना धडक दिली.

पुण्यात वडगाव धायरी येथील नवले पुलाजवळ ट्रकने आठ वाहनांना धडक देऊन १२ जणांना जखमी केल्याची घटना ताजी असताना सायंकाळी साडे सहाच्या सुमारास कोथरूडमध्ये देखील असाच अपघात घडला. कोथरुडमधील आशीष गार्डनजवळ एका भरधाव टेम्पोने आठ गाड्यांना उडवण्याची घटना घडली. याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेबाबत माहिती देताना कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अप्पा शेवाळे म्हणाले, आशीष गार्डनजवळ एका टेम्पोने साडे सहाच्या सुमारास दुचाकी, चारचाकी, रिक्षा अशा एकूण आठ वाहनांना धडक दिली. या अपघातामुळे संबंधीत वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, घटनास्थळावरील नागरिकांनी संबंधीत टेम्पो चालकाला चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 7:43 pm

Web Title: 8 vehicles crushed from mini tempo at kothrud
Next Stories
1 यंदा ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’ रमणबागच्या मैदानावर होणार नाही
2 नैराश्यामुळे डॉक्टरची आत्महत्या, पुण्यातील घटना
3 ना शरद पवार, ना पार्थ पवार, मीच लढवणार लोकसभा-सुप्रिया सुळे
Just Now!
X