दहावीच्या बोर्डाचा पेपर देऊन घरी परत जात असताना विद्यार्थचा अपघात झाला होता. १९ मार्चला हा अपघात झाला. अपघातात गणेश ज्ञानोबा हाके याचा उजवा पाय जायबंदी झाला. त्यामुळे त्याला उर्वरित दोन पेपर देण्यास परीक्षा केंद्रावर जाणे शक्य नव्हते. त्याच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याच रुग्णालयात बसून त्याला पेपर लिहण्याची परवानगी शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि बोर्डाने त्याला दिली. त्यानुसार त्याने आज आय.टी.सी.चा पेपर दिला.

गणेश ज्ञानोबा हाके वय-१५ वर्ष रा.आंबोली हा १९ मार्च ला दहावीच्या बोर्डाची परीक्षा देऊ घरी जात होता त्यावेळी तळेगाव चाकण हा रस्ता ओलांडत असताना दुचाकीने जोरात धडक दिली होती. त्याच्या उजव्या पायाला गंभीर इजा झाली असून पाय जायबंदी झाला आहे. त्यानंतर काही नागरिकांनी जखमी गणेशला खासगी रुग्णालयात दाखल केलं. परंतु तेथे त्याच्या उपचारासाठी खर्च आवाक्याच्या बाहेर सांगितला गेला. जखमी गणेश हाकेच्या नातेवाईकांनी डॉ.विजय गोकुळे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या घटनेची दाखल घेत चिंचवड येथील मित्राच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी त्याला बिलमध्ये ५० टक्के सूट देण्यात येणार आहे.

मात्र प्रश्न होता २१ आणि २२ मार्चच्या दहावी बोर्डाच्या परीक्षेचा. यामुळे डॉक्टर विजय गोकुळे यांना याविषयी नियमावली माहीत होती. त्यानुसार त्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना मोबाईल द्वारे मेसेज केला. मात्र उत्तर न मिळाल्याने त्यांनी शिवाजी नगर येथील एस.एस.सी बोर्ड येथील केंद्रात जाऊन अधिका-यांशी बोलून सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं. २० तारखेला सायंकाळी उशिरा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या सचिवांचा (PA) फोन आला. त्यांचं रीतसर अधिका-यांशी बोलणं झालं.आणि त्यांना गणेश हाके या विद्यार्थचा नावाचे पत्र देण्यात आले.याविषयी चाकण येथील परीक्षा केंद्राला याची माहिती देण्यात आली.त्यानुसार २१ मार्च आणि आज २२ मार्च रोजी पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत रुग्णालयाच्या एका खोलीत गणेश हाके याने परीक्षा दिली.योग्य वेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निर्णय घेतल्याने विद्यार्थांचे नुकसान होण्या पासून वाचले आहे.तर गणेशने देखील शिक्षण मंत्रिसह,इतरांचे आभार मानले आहेत.गणेशच्या घरची हालकीची परिस्थिती असल्याने त्यांच्या समोर रुग्णालयाचे बिल भरणे कठीण आहे.