News Flash

घरगुती विवाहात नवदाम्पत्याला अनोखी भेट

करोना संसर्गाला अटकावासाठी सुरक्षा संच

करोना संसर्गाला अटकावासाठी सुरक्षा संच

पुणे : पोलिसांच्या परवानगीनंतर मंगळवारी दत्तवाडी भागात घरगुती विवाह सोहळा पार पडला. पोलिसांनी नवविवाहित दाम्पत्याला करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी सुरक्षा संच भेट दिला. पोलिसांनी दिलेल्या अनोख्या भेटीने नवदाम्पत्याला नवल वाटले.

दत्तवाडी भागातील रहिवासी प्रताप गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांचा विवाह अमोल चंद्रकांत काकडे यांच्या बरोबर निश्चित करण्यात आला होता.  ज्योती आणि अमोल दोघेही उच्चशिक्षित आहेत. टाळेबंदीमुळे विवाह कसा पार पडणार, अशी चिंता प्रताप गायकवाड यांना होती. त्यामुळे गायकवाड यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांची भेट घेतली. घेवारे यांनी विवाहाला परवानगी दिली. करोनाच्या संसर्गामुळे विवाह समारंभ अतिशय साधेपणाने तसेच मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत पार पाडावा, असे घेवारे यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर गायकवाड यांनी  मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत विवाह पार पाडण्याचे ठरवले.

त्यानुसार गायकवाड आणि काकडे यांचा विवाह घरगुती वातावरणात अतिशय साधेपणाने विवाह सोहळा पार पाडला. नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, हवालदार श्रीकांत शिरोळे उपस्थित होते. विवाह समारंभात आहेर देण्याची प्रथा पोलिसांनी कायम ठेवली.

नवदाम्पत्याला सुरक्षा संच (किट) भेट देण्यात आला. या संचात जंतुनाशक, मुखपट्टी, हातमोजे आहेत. स्थानिक नगरसेवक आनंद रिठे, अभिजित बारावकर आदी या प्रसंगी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:50 am

Web Title: a unique gift for a newlywed couple at a home wedding zws 70
Next Stories
1 हैदराबादमध्ये अडकलेल्या ४९ जणी मूळ गावी
2 साठ लाखांची ‘नाका बंदी’
3 करोनाविरुद्धच्या लढय़ात ७० हजारांहून अधिक शिक्षक
Just Now!
X