News Flash

पुणे – कारला आग लागल्याने महिलेचा मृत्यू

कारला आग लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

कारला आग लागल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कारला आग लागली तेव्हा महिला कारमध्येच होती. ही घटना रात्री उशिरा हिंजवडी परिसरात घडली आहे. संगीता मनीष हिवाळे (४४) असं मयत महिलेचे नाव आहे. महिलेसह तिचा मुलगा सायमन मनीष हिवाळे (१५) आणि गाडीचालक जॉन डॅनियल बोर्डे (४०) देखील कारमध्येच होते.

आग लागलेल्या गाडीचा नंबर एम.एच-१४ ए.एम-३७०९ असून आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2018 10:41 am

Web Title: a woman died after car caught fire
Next Stories
1 उत्सवात संसर्गजन्य रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खबरदारीचे आवाहन
2 आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुस्लीम समाजाचा मूक मोर्चा
3 बोअरवेलमधून पेट्रोल येत असल्याने चर्चा
Just Now!
X