News Flash

राजेंद्र जगताप यांची अखेर बदली, पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी शितल उगलेंची नियुक्ती

कार्यकाळ संपल्यानंतरही राजेंद्र जगताप अतिरिक्त आयुक्तपदी कार्यरत होते.

पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी शितल उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे महानगरपालिकेचे अतिरक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांचा कार्यकळ संपल्यामुळे त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी रायगडच्या जिल्हाधिकारी शितल उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाने सोमवारी अध्यादेश जारी केला.

पुण्याचे अतिरिक्त आयुक्त म्हणून राजेंद्र जगताप यांचा कार्यकाळ ३ वर्षाचा पूर्ण होऊन देखील या पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांची बदली संदर्भात विविध स्वंयसेवी संस्थाकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत  होते. पतंगराव कदम यांचे जावाई असल्यामुळे ते पुण्याच्या अतिरिक्त आयुक्तपदी म्हणून कार्यरत असल्याची चर्चा देखील रंगल्याचे पाहायला मिळाले. मात्र, सोमवारी अखेर राजेंद्र जगताप यांची बदली झाली असून या पदावर रायगडच्या जिल्हाधिकारी शितल उगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेचे कार्यक्षम अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची दोन वर्षांतच बदली करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी काम करत असलेले राजेंद्र जगताप यांच्या बदलीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यांचा कार्यकाळ संपलेला असतानाही त्यांची बदली करण्यात येत नाही. जगताप यांची बदली करण्याबाबत सोयीस्कर विसर राज्याच्या नगर विकास विभागाला पडला आहे, असाही आरोप करण्यात आला होता.

पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्ती झालेल्या शितल उगले या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिल्या आल्या आहेत. शितल उगले यांनी रायगड जिल्हातील कारकिर्दीत वाळू तस्करांची चांगलीच कोंडी केली होती. वांरवार दंडात्मक कारवाई करून अवैध रेती उत्खनन थांबत नसल्याने वाळू तस्करांवर जप्तीची कारवाई करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 8:35 pm

Web Title: after rajendra jagtap transfer raigad collector shital ugle new pune corporation additional commissioner
Next Stories
1 ‘दुष्काळात तेरावा महिना’, जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर
2 नयना पुजारी हत्या प्रकरण: जाणून घ्या सात वर्षातील घटनाक्रम
3 Nayana Pujari case : नयना पुजारी खून खटल्यात तिन्ही आरोपी दोषी; उद्या शिक्षेची सुनावणी
Just Now!
X