News Flash

‘सुंदर माझं पिंपरी-चिंचवड’ छायाचित्र स्पर्धेत अनुजा ओहोळ प्रथम

‘सुंदर माझं पिंपरी-चिंचवड’ या छायाचित्र स्पर्धेत अनुजा ओहोळ यांच्या छायाचित्रास २५ हजाराचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

पिंपरी पालिकेच्या वतीने आयोजित ‘सुंदर माझं पिंपरी-चिंचवड’ या छायाचित्र स्पर्धेत अनुजा ओहोळ यांनी काढलेल्या निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूहाच्या छायाचित्रास २५ हजाराचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. द्वितीय क्रमांक सई जाधव यांना, तर स्वप्निल कांबळे यांना तृतीय क्रमांक देण्यात आला आहे. याशिवाय, दिनेश पाठक व सुप्रिया कासार यांना उत्तेजनार्थ पारितोषिके आहेत. या स्पर्धेत एकूण ८५० छायाचित्रे प्राप्त झाली होती. विजेत्यांना सोमवारी (१२ ऑक्टोबर) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेतील निवडक छायाचित्रांचे प्रदर्शन मंगळवारी चिंचवड नाटय़गृहात भरवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 3:10 am

Web Title: anuja ohol gets first prize in photography comp
Next Stories
1 पुणेकर रसिकांकडून मिळालेला पुरस्कार ही विशेष आनंदाची गोष्ट
2 भोसरीत गुंडांच्या टोळक्याकडून सशस्त्र धुमाकूळ; वाहनांची तोडफोड
3 पुण्यात वादळी पावसाच्या सरी