‘व्हिवा लाऊंज’मध्ये करीअरची नवी वाट उलगडणार

पुणे : देशभरातील मोठमोठय़ा कंपन्या, बँकांमधून शिताफीने केल्या जाणाऱ्या आर्थिक गैरव्यवहारांचा माग काढणाऱ्या अपूर्वा जोशी यांच्याशी बुधवारी (२२ मे) ‘लोकसत्ता’च्या ‘व्हिवा लाऊंज’मध्ये होणाऱ्या गप्पांतून करीअरची नवी वाट उलगडणार आहे.

Elon Musk
टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”

फॉरेन्सिक अकाऊंटिंग क्षेत्रात तज्ज्ञांची मोठय़ा प्रमाणावर गरज असून या क्षेत्रात स्त्रियांचे प्रमाण अत्यल्प आहे, याकडे लक्ष वेधणाऱ्या अपूर्वा जोशी यांनी त्यासाठीच्या अभ्यासक्रमाची रचना करण्यामध्येही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्या क्षेत्राची माहितीच नव्हती अशा क्षेत्राची अनवट वाट सापडल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास करून त्यात घट्ट पाय रोवून उभ्या राहणाऱ्या अपूर्वा यांच्याशी ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘व्हिवा लाऊंज’मध्ये संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.

कला, विज्ञान-तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर भरारी घेणाऱ्या स्त्रियांचा प्रवास, त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न लोकसत्ता व्हिवा लाऊंज कार्यक्रमाद्वारे केला जातो. मयूर कॉलनी येथील बाल शिक्षण मंदिर सभागृह येथे सायंकाळी पावणेसहा वाजता अपूर्वा जोशी यांच्याशी संवाद साधता येणार आहे.

वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सनदी लेखापाल आणि कंपनी सचिव अभ्यासक्रमाची  तयारी सुरू करणाऱ्या अपूर्वा यांना न्यायवैद्यक लेखापरीक्षण (फॉरेन्सिक अकाऊंटिंग) क्षेत्राची माहिती मिळाली. याच क्षेत्रात करीअरचा निर्णय घेतल्यानंतर अपूर्वा यांनी त्याविषयीचे दोन अभ्यासक्रम पूर्ण केले. त्यानंतर अमेरिकेतूनही एक अभ्यासक्रम पूर्ण केला. या क्षेत्रात काम सुरू करत असतानाच ‘फ्रॉड एक्स्प्रेस’ ही स्वत:ची कंपनी सुरू केली. सध्या रिस्क प्रो मॅनेजमेंट कन्सल्टिंग या कंपनीच्या संचालक असलेल्या अपूर्वा सध्या या क्षेत्रातील नामांकित तरुण उद्योजिका आहेत.

* कधी- बुधवार, २२ मे २०१९

* कुठे- महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी बालशिक्षण मंदिर ऑडिटोरियम, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे</p>

* वेळ- सायं. ५.४५ वाजता

प्रथम येणाऱ्यास प्राधान्य.

फॉरेन्सिक अकाऊंटिंग म्हणजे काय? त्याचा अभ्यासक्रम आणि पुढे काम करण्यासाठी असलेल्या संधी याचबरोबरीने तिचे अनुभव अशा नानाविध विषयांवर अपूर्वाशी गप्पाष्टक रंगणार आहे..