पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) ‘द इनर पाथ’ या बुद्ध चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुन्हा एकदा ८ ते १० नोव्हेंबर २०१३ दरम्यान करण्यात आले आहे.
नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडिया (एनएफएआय) येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामध्ये बुद्ध तत्त्वज्ञान तसेच संलग्न विषयांवर व प्रश्नांवर आधारित ९ आशियाई आणि पाश्चिमात्य देशांमधील ११ चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. ‘इनर पीस’ अर्थात मनशांती हा या सर्व कलाकृतींचा गाभा आहे. हा महोत्सव सर्वासाठी विनामूल्य खुला असल्याचे ‘पीआयसी’चे संचालक प्रशांत गिरबने यांनी सांगितले.
लतिका पाडगांवकर यांच्या समन्वयातून पुण्यामध्ये हा महोत्सव होत असून, ‘नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमा’ (एनइटीपीएसी) आणि ‘एनएफएआय’ यांच्या सहकार्याने हा चित्रपट महोत्सव ‘पीआयसी’ने आयोजित केला आहे. शुक्रवारी (दि. ८) संध्याकाळी सहा वाजता ‘एनएफएआय’ येथे धम्मचारी लोकमित्र यांच्या हस्ते एका समारंभात महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, ‘एनइटीपीएसी’च्या अध्यक्षा अरुणा वासुदेव आणि ‘एनएफएआय’चे संचालक प्रशांत पाठराबे या वेळी उपस्थित राहणार आहेत.
बुद्ध तत्त्वज्ञानावरचे अनेक चित्रपट महोत्सव सिंगापूर, हाँगकाँग, कॅलिफोíनया, लंडन, वॉिशग्टन आणि जगभरातील इतर अनेक शहरांमध्ये दरवर्षी होतात. मात्र, हा महोत्सव ‘एनइटीपीएसी’च्या अध्यक्षा अरुणा वासुदेव यांच्या संकल्पनेमधून आकाराला आला आहे.