राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा पाचवा अहवाल (एनएफएचएस,२०१९-२०) प्रसिद्ध झाला असून यात २२ राज्यांचे सर्वेक्षण केले आहे. उर्वरित राज्यांचे सर्वेक्षण करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे पूर्ण होऊ न शकल्याने लवकरच पुढचा अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे. राज्यात १९ जून ते ३० डिसेंबर या काळात हे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालात रक्तक्षयाचे आव्हान, वाढते घरगुती हिंसाचार, लैंगिक हिंसाचार, कर्करोगाचे वाढते प्रमाण मात्र त्यासाठीच्या तपासण्यांची कमतरता यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

बालके , महिला आणि पुरुष यांच्यातील रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) रोखणे हे महत्त्वाचे आव्हान आरोग्य यंत्रणांपुढे असल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या ताज्या निरीक्षणांमधून स्पष्ट झाले आहे. गरोदर महिलांमधील अ‍ॅनिमिया वगळता इतर सर्व नागरिकांमध्ये २०१५-१६ च्या तुलनेत अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

loksatta analysis increasing sugar production in maharashtra
विश्लेषण : साखर उद्योगावर पुन्हा एकदा महाराष्ट्राची मक्तेदारी?
3334 children underwent heart surgery under the National Child Health Programme
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ३,३३४ मुलांवर हृदय शस्त्रक्रिया! दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Golden Jubilee of Mumbai grahak Panchayat fighting for consumer rights
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जागल्याचा सुवर्णमहोत्सव…

सहा महिने ते पाच वर्ष वयापर्यंतच्या बालकांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढून ६८.९ टक्के एवढे झाल्याचे दिसत आहे. २०१५-१६ मध्ये हे प्रमाण ५३.८ टक्के एवढे होते. शहरी बालकांमधील अ‍ॅनिमियाचे प्रमाण ६६.३ टक्के तर ग्रामीण बालकांमधील अ‍ॅनिमियाचे प्रमाण ७०.७ टक्के एवढे आहे. १५ ते ४९ वर्ष वयोगटातील गरोदर नसलेल्या महिलांमध्येही अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. या वयोगटातील ४७.९ टक्के महिलांना २०१५-१६ मध्ये अ‍ॅनिमियाचे निदान झाले होते. सद्य:स्थितीत हे प्रमाण ५४.५ टक्के एवढे आहे. त्यांपैकी ५२.३ टक्के महिला शहरी तर ५६.४ टक्के महिला ग्रामीण भागाच्या रहिवासी आहेत. त्याच वयोगटातील गरोदर महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण मात्र ४९.३ टक्के वरून ४५.७ टक्क्यांवर आले आहे. त्यांपैकी ४४.२ टक्के महिला शहरी तर ४६.५ टक्के महिला ग्रामीण भागातील आहेत.

* १५ ते ४९ वर्ष वयोगटातील पुरुषांमध्येही अ‍ॅनिमियाचे प्रमाण लक्षणीय आहे.

* तब्बल २१.९ टक्के पुरुषांना अ‍ॅनिमिया आहे. त्यांपैकी १७.४ टक्के पुरुष शहरी भागातील आहेत, तर २५.४ टक्के पुरुष ग्रामीण भागातील आहेत.

* २०१५-१६ च्या सर्वेक्षणानुसार पुरुषांमधील अ‍ॅनिमियाचे प्रमाण १७.७ टक्के  होते, त्यामुळे पुरुषांमधील अ‍ॅनिमियाही वाढल्याचेच या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

एचआयव्ही बाबत जागृती

एचआयव्ही एड्स या आजाराच्या संसर्गाबाबत असलेल्या जनजागृतीमध्ये वाढ झाल्याचे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ही जनजागृती अधिक आहे. शहरी भागातील ३९.२ टक्के तर ग्रामीण भागातील ३०.१ टक्के महिलांमध्ये एचआयव्ही संसर्ग आणि प्रतिबंध याबाबत माहिती आहे. शहरी पुरुषांमध्ये हे प्रमाण ५०.७ टक्के आणि ग्रामीण पुरुषांमध्ये हे प्रमाण ३५.१ टक्के एवढे आहे. निरोध वापरल्याने एचआयव्ही संक्रमण कमी होते याची माहिती शहरी महिलांमध्ये ७६.३ टक्के तर ग्रामीण महिलांमध्ये ६८.५ टक्के आहे. शहरी पुरुषांमध्ये हे प्रमाण ८९.६ टक्के आणि ग्रामीण पुरुषांमध्ये हे प्रमाण ७९.८ टक्के एवढे आहे. २०१५-१६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या तुलनेत यंदा दिसलेली वाढ समाधानकारक आहे.

ग्रामीण भागात धूररहित इंधनाच्या वापरावर भर

स्वयंपाकासाठी चुलीपेक्षा बायोगॅस, वीज, एलपीजी अशा धूररहित इंधनाचा वापर करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे नोंदले आहे. हे प्रमाण ५९ टक्क्यांवरून ७९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण दुपटीने वाढले असून ३३ टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढल्याची नोंद आहे, तर शहरी भागातही ८७ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. आसाम, मेघालय, नागालँड, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये धूररहित इंधनाचा वापर हा ४५ टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे आढळले आहे.

महिला सबलीकरणाचा प्रवास मोठा

सर्वेक्षणातून समोर येणारी महिला सबलीकरणाची माहिती काही बाबतीत समाधानकारक आहे, काही बाबींमध्ये मात्र अद्यापही मोठा पल्ला गाठायचा आहे, असे दिसते. विवाहित महिला घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण ८९.८ टक्के आहे. २०१५-१६ च्या सर्वेक्षणाच्या तुलनेत ही वाढ नगण्य आहे. ३४.७ टक्के महिला काम करतात आणि त्याचा पैशाच्या स्वरूपातील मोबदला त्यांना मिळतो. केवळ २२.९ टक्के महिलांच्या नावावर घर किंवा जमीन स्वरूपातील मालमत्ता आहे. मासिक पाळीच्या काळात आरोग्यदायी साधने उपलब्ध असलेल्या महिलांचे प्रमाण मात्र ६६.१ टक्क्यांवरून ८४.८ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. त्यांमध्ये शहरी भागातील ९०.२ टक्के तर ग्रामीण भागातील ८०.१ टक्के महिलांचा समावेश आहे.

प्रौढांमधील व्यसनाधीनता

१५ वर्षांवरील प्रौढांमध्ये तंबाखू आणि अल्कोहोल सेवन या निकषावर २०१५-१६ च्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातील माहिती स्पष्ट नाही. १५ वर्षांवरील शहरी महिलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ६.६ टक्के तर ग्रामीण महिलांमध्ये हे प्रमाण १४.७ टक्के आहे. १५ वर्षांवरील २६.२ टक्के शहरी पुरुष आणि ४०.६ टक्के ग्रामीण पुरुष तंबाखूचे सेवन करतात. १५ वर्षांवरील अल्कोहोल सेवन करणाऱ्या शहरी आणि ग्रामीण महिलांचे प्रमाण नगण्य म्हणजे ०.४ टक्के एवढे आहे, मात्र पुरुषांचे प्रमाण १३.९ टक्के एवढे आहे. त्यांपैकी १३ टक्के पुरुष शहरी भागातील तर १४.७ टक्के पुरुष ग्रामीण भागातील आहेत.

ग्रामीण भागात इंटरनेट, मोबाइलचा वापर कमीच

मुंबई : राज्यात शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात अजूनही इंटरनेट आणि मोबाइलचा वापर कमी प्रमाणात होत असल्याचे एनएफएचएस-५ च्या अहवालातून निदर्शनास आले आहे. तसेच महिलांच्या तुलनेत पुरुष इंटरनेटचा वापर अधिक करत असल्याचेही यातून मांडले आहे.

* या अहवालानुसार, राज्यात ६१ टक्के पुरुष, तर ३८ टक्के महिला इंटरनेटचा वापर करतात.

* शहरात इंटरनेटचा वापर ७६ टक्के पुरुषांनी केला आहे, तर ग्रामीण भागात ४७ टक्के जणांनी केला आहे.

* राज्यात मोबाइलचा वापर करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण ४५ टक्क्यांवरून ५४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. शहरातील स्त्रिया मोबाइलचा सर्वाधिक म्हणजे ६८ टक्के वापर करत असून ग्रामीण भागात हे प्रमाण ४३ टक्के नोंदले आहे.

* शहरातील ५४ टक्के स्त्रिया इंटरनेट वापरत असून ग्रामीण भागात हे प्रमाण २३ टक्के आहे.

जन्मानंतर त्वरित स्तनपानात घट

बाळाच्या जन्मानंतर एका तासाच्या आत केलेले स्तनपान बाळाला आयुष्यभराच्या निरोगी आयुष्यासाठी पुरेशी रोप्रतिकारशक्ती देते, त्यामुळे हे स्तनपान अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, २०१५-१६ च्या राष्ट्रीय कु टुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या तुलनेत त्याचे प्रमाण घटल्याचे चित्र आहे. २०१५-१६ मध्ये जन्मानंतर त्वरित स्तनपान देण्याचे प्रमाण ५७.५ टक्के होते. नवीन सर्वेक्षणात हे प्रमाण ५३.२ टक्के एवढे कमी झाल्याचे दिसत आहे. त्यांमध्ये शहरी भागातील प्रमाण ५१.८ टक्के तर ग्रामीण भागातील प्रमाण ५४.३ एवढे आहे. त्यामुळे जन्मानंतर पहिल्या एका तासात बाळाला स्तनपान देण्याबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे.

* १५ ते ४९ वर्ष वयोगटातील पुरुषांमध्येही अ‍ॅनिमियाचे प्रमाण लक्षणीय आहे.

* तब्बल २१.९ टक्के पुरुषांना अ‍ॅनिमिया आहे. त्यांपैकी १७.४ टक्के पुरुष शहरी भागातील आहेत, तर २५.४ टक्के पुरुष ग्रामीण भागातील आहेत.

* २०१५-१६ च्या सर्वेक्षणानुसार पुरुषांमधील अ‍ॅनिमियाचे प्रमाण १७.७ टक्के होते, त्यामुळे पुरुषांमधील अ‍ॅनिमियाही वाढल्याचेच या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.