ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनावर आधारित ‘आंदोलन- एक सुरुवात एक शेवट’ हा चित्रपट तयार झाला असून, त्यात अण्णांचीसुद्धा भूमिका आहे. हा चित्रपट क्रांतिदिनाच्या मुहूर्तावर, ८ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटात अण्णा हजारे यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. अण्णांचे राळेगणसिद्धीतील कार्य, महात्मा गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करून लोकशाही बळकट करण्यासाठी केलेले जनआंदोलन अशा अनेक गोष्टींचा या चित्रपटात समावेश आहे. बाबू भोईर कोपरवाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. दिग्दर्शन प्रशांत राणे यांनी केले आहे. कथा, पटकथा आणि संवाद राणे यांनीच लिहिले आहेत. या चित्रपटात अरुण नलावडे, मिलिंद गवळी, निशा परुळेकर, विजय चव्हाण, प्रीतेश पाटकर, आदित्य नेरुळकर आदींच्याही भूमिका आहेत. या चित्रपटातील शालेय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे खास चित्रीकरण कोकणातील मालवण येथे करण्यात आले आहे.