News Flash

किरकोळ वादातून दांपत्याने पाचव्या मजल्यावरून मारली उडी

पुण्यातील उत्तमनगर येथे किरकोळ वादातून पती आणि पत्नीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना समोर आली आहे

पुण्यातील उत्तमनगर येथे किरकोळ वादातून पती आणि पत्नीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. दांपत्याने बाजूला असणाऱ्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर उडी मारली. दरम्यान पती आणि पत्नी दोघे गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोज नंदकिशोर वलवे (36) आणि सोनाली मनोज वलवे (30) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज नंदकिशोर वलवे हे ठेकेदार असून ते उत्तमनगर येथे राहतात. नंदकिशोर आणि सोनाली यांच्यात संध्याकाळी 9 वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यावेळी पत्नी सोनाली यांनी शेजारील इमारतीच्या चौथ्या मजल्यावर उडी मारली. त्याचदरम्यान मनोज यांनीदेखील रागाच्या भरात उडी मारली. ही घटना आजूबाजूच्या नागरिकांना समजताच तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती उत्तमनगर पोलिसांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 12:38 am

Web Title: couple jumps from fifth floor in pune
Next Stories
1 लोकमान्य टिळक नव्हे भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवाचे जनक – पुणे महापालिका
2 पूजा घालायच्या असतील तर त्या स्वतःच्या घरी घाला – खासदार सुप्रिया सुळे
3 प्रमोशनसाठी अनधिकृत स्टेज शो करणाऱ्या मोबाइल दुकानांविरोधात मनसेचे खळ्ळखटॅक
Just Now!
X