शोमा सेन यांच्या लॅपटॉपमध्ये जे मेल मिळाले आहेत, त्यामध्ये तेलतुंबडे यांनी पॅरिसला जाऊन कोरेगाव भीमा विषय ज्वलंत ठेवावा असे सूचित करण्यात आले. मात्र हा मेल बनावट असल्याचा दावा बचाव पक्षाच्या वकिलानी आज न्यायालयात केला. विशेष सत्र न्यायाधीश किशोर वडणे न्यायालयात आनंद

तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी आणि बचाव पक्षाचे वकील रोहन नहार यांनी काम पाहिले. यावेळी बचाव पक्षाचे वकील रोहन नहार युक्तिवाद करताना म्हणाले की, आनंद तेलतुंबडे हे अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून 2017 ला पॅरिसला गेले होते. त्याचा खर्च हा त्या विद्यापीठाने केला होता.या दौऱ्याचा माओवाद्यांशी काहीही संबंध नाही.

तसेच एल्गार परिषदेसंदर्भात पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन काही पत्र जाहीर केली. पोलिसांनी त्यांच्या उत्तरामध्ये ही या पत्रांचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पोलिसांना काय तपास करायचा आहे, हा मोठा प्रश्न आहे. एल्गार परिषद आणि भीमा कोरेगावच्या व्यतिरिक्त अन्य गोष्टींचा समावेश प्रकरणामध्ये का केला जात आहे. असा सवाल बचाव पक्षाच्या वकिलांनी केला.

तसेच ते पुढे म्हणाले की, आनंद तेलतुंबडे यांच्यावर अन्य कोणत्याही प्रकारचे आरोप नाहीत.त्या प्रमाणेच ते तपासासाठी ही उपलब्ध आहे. जर पोलिसांना त्यांच्याकडे पैशांच्या देवाण घेवणीसाठी तपास करायचा असेल तर यासंदर्भात बँकेकडून पोलिसांना ती माहिती मिळू शकते. ही बाब न्यायालयच्या निर्देशनास आणून दिली. तर शोमा सेन यांच्या लॅपटॉपमध्ये जे मेल मिळून आलेले आहेत. त्यामध्ये तेलतुंबडे यांनी पॅरिसला जाऊन कोरेगाव भीमा विषय ज्वेलंत ठेवावा असे सूचित या मेलमध्ये करण्यात आले. मात्र हा मेल बनावट असल्याचे बचाव पक्षाच्या वकिलाने सांगितले आहे. बचाव पक्षाचे म्हणणे झाल्यावर आजचे कामकाज तहकूब करण्यात आले आणि आता उद्या सरकारी वकील त्यांची बाजू मांडणार आहे.