हडपसर, बिबवेवाडी भागात कारवाई

पुणे : अमली पदार्थाची विक्री प्रकरणात पोलिसांनी हडपसर तसेच बिबवेवाडी भागात कारवाई करुन तिघांना पकडले. त्यांच्याकडून तीन किलो गांजा जप्त करण्यात आला.

बिबवेवाडी परिसरातील गंगाधाम रस्त्यावर एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकातील क र्मचाऱ्यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून आसिफ मज्जीद सातारकर (वय ३५,रा. लक्ष्मीनगर, कोंढवा) याला पकडले. त्याच्याकडून १ किलो ५५०  गॅ्रम गांजा तसेच रोकड असा ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक नीलेश महाडीक, मनोज शिंदे, प्रमोद मगर, प्रवीण पडवळ, मंगेश पवार यांनी ही कारवाई केली.

दरम्यान, हडपसर भागातील सय्यदनगर परिसरात दोघे जण दुचाकीवरुन थांबल्याची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दुचाकीवरील  दोघांना पकडले. दोघांकडे असलेल्या पिशवीची झडती घेण्यात आली. पिशवीत गांजा आढळून आला. या प्रकरणी रिझवान महमद नसीर शेख (वय २६,रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर) आणि सलमान कलीम खान (वय २७,रा. सय्यदनगर, महंमदवाडी रस्ता, हडपसर) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून दुचाकी आणि २ किलो ३२९ गांजा जप्त करण्यात आला. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  क्रांतीकुमार पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, रमेश भोसले, महेश कांबळे यांनी ही कारवाई केली.