लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने अनेक आश्वासनं दिली. त्यानंतर त्यांची सत्ताही आली, मात्र जनतेला दिलेले एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केलेले नाही. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरण करत शहरांची आणि गावांची नावं बदलण्याचा घाट सरकारने  घातला आहे. या सरकारला इतिहासाची लाज वाटते का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला आहे. आता पुण्याचे नाव बदलण्याची मागणी होत आहे. त्यांनी एवढे लक्षात ठेवावे की, इतिहास पुसण्याचे काम करू नये. तुम्हाला इतिहासाची लाज वाटते का ? अशा शब्दात राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप आणि संभाजी ब्रिगेड वर निशाण साधला.

केंद्र सरकारने नोटाबंदी घेतलेल्या निर्णयाला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज पुण्यात काँग्रेस भवन येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेस चे सर्व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.तसेच यावेळी पृथ्वीराज चव्हाण केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका देखील केली. तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी बाबत त्यांनी भूमिका देखील मांडली.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र लढणार का? मनसे ला बरोबर घेणार का या प्रश्नावर चव्हाण म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्रित लढणार असून जागा वाटपा बाबत सकारात्मक चर्चा देखील झाली असून पुढील बैठक मुंबई मध्ये या आठवड्यात होणार आहे. तसेच आम्ही मनसे ला सोबत घेणार नाही. मात्र प्रकाश आंबेडकर यांना बरोबर घेण्यास तयार असून त्यांच्यासाठी काही जागा सोडण्यास तयार असल्याची भूमिका त्यांनी मांडल्याने आगामी काळात राज्याच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तुम्ही पुण्यातून लोकसभेची जागा लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रश्‍नावर ते म्हणाले की, मी कराड दक्षिण मधून विधानसभा निवडणूक लढवणार पुण्यातून मी अजिबात इच्छुक नसून पुण्यातील लोकसभेची जागा कोण लढविणार हे ठरले नसल्याचे त्यांनी सांगितले.
अवनी वाघिणी मृत्यू प्रकरणावरून राज्य सरकार वर सर्व स्तरातून लक्ष केले जात आहे. त्यावर ते म्हणाले,अवनी वाघिणी ला बेशुद्ध करण्याची आवश्यकता होती. मात्र या सरकारने तिचा फेक इन काऊंटर केला. अशा शब्दात भाजप सरकार वर त्यांनी सडकून टीका केली.