नोटाबंदीच्या पाश्र्वभूमीवर ‘क्रेडाई’चे स्पष्टीकरण

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या निर्णयाने गृहबांधणी व्यवसायाच्या ऊर्जतिावस्थेस, विकासास मदतच होणार आहे. या निर्णयामुळे घरांचे दर कमी होणार नसले, तरी गृहकर्जावरील व्याजदर कमी होणार आहेत. आतापर्यंत बँकांमध्ये पसा न ठेवणारे सर्वसामान्य ग्राहक बँकेद्वारे आíथक व्यवहार करणार असल्याने गृहकर्जास पात्र ठरतील. त्यामुळे घरखरेदीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल, असे मत बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई पुणे मेट्रो’ या संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.

संघटनेने याबाबत एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटल्यानुसार, नोटाबंदीच्या निर्णयाने घरांच्या किमती मोठय़ा प्रमाणावर घसरतील, असा चुकीचा प्रचार चालवला आहे. नोटाबंदीमुळे बँकांकडे मोठय़ा प्रमाणावर पसा येणार आहे. त्यामुळे कर्ज आणि ठेवींवरील व्याजदर कमी होणार आहेत. मुदत ठेवींवरील व्याजदर पाच-सहा टक्क्यांवर येतील आणि गृहकर्जाचे व्याजदर सात-आठ टक्क्यांपर्यंत कमी होतील. या व्याजदर कपातीमुळे बांधकाम व्यवसायाला ऊर्जतिावस्था प्राप्त होईल. ग्राहक, गुंतवणूकदार, उद्योजक-व्यावसायिकांसाठी स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक आकर्षक ठरणार आहे.

घरांच्या किमती कायम राहणार असल्या, तरी गृहकर्जावरील कमी व्याजदर आणि परवडणाऱ्या मासिक हप्त्यांमुळे घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल. या निर्णयामुळे छोटय़ा दुकानदारांपासून कॉर्पोरेट क्षेत्रापर्यंत आणि डॉक्टरांपासून चार्टर्ड अकांऊंटंटपर्यंत विविध क्षेत्रांतील व्यावसायिक, उद्योजकांचा मोक्याच्या जागा घेण्यावर भर राहील. बँका आपला करोडोचा निधी सरकारी रोख्यांमध्ये गुंतवतील. त्यामुळे सरकारला पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होईल. स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियान, सर्वासाठी परवडणारी घरे आदी महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावण्यासाठी सरकारला आíथक ताकद मिळेल. पुण्यासारख्या शहरांसाठी नवा विमानतळ, राज्य-राष्ट्रीय महामार्गाची सुविधा, शहरातील वाहतुकीत सुधारणा झाल्याने शहरातील स्थावर मालमत्तेला मागणी वाढेल, असेही क्रेडाईच्या निवेदनात म्हटले आहे.