करोना व्हायरसची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस देशात वाढतच आहे. महाराष्ट्र याबाबतीत अव्वल आहे. त्यात मुंबई खालोखाल पुणे शहराचा क्रमांक लागत आहे. रविवारी (29 मार्च) दिवसभरात शहरात करोनाची बाधा झालेले चार रुग्ण आढळले असून पुण्याची करोना बाधित रुग्णांची संख्या आता 28 झाली आहे.

देशातील अनेक भागात हे रुग्ण आढळत आहे. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र तरी देखील रुग्ण आढळत असल्याने  सरकारकडून अनेक उपाय योजना केल्या जात आहे.

पुण्यात दिवसभरात 4 बाधित रुग्ण आढळले असून पुण्यातील रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. तसेच आज दिवस अखेर यातील 7 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. या सर्व रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर आज जे नवे 4 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.