पुण्यातील स्वारगेट चौकात दुचाकीवरुन जात असताना चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. सुप्रिया उद्य मूलया असं या तरुणीचं नाव आहे. ती २० वर्षांची होती.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर भागात सुप्रिया उदय मूलया ही २० वर्षीय तरुणी कुटुंबा सोबत वास्तव्य करत होती. आज सकाळी ९ वाजता कामासाठी घरातून बाहेर पडल्यावर, स्वारगेट येथील पुलावर दुचाकीवरून जाताना चार चाकी वाहनाने, सुप्रियाच्या दुचाकीला पाठी मागून जोरात धडक दिली. त्या धडकेत गंभीर जखमी झाल्याने, तिला नागरिकांनी जवळील रूग्णालयात दाखल केले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.  या घटने बाबत स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.