होंडा सिटी कारच्या धडकेत आजी आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खराडी भागात हा अपघात झाला, रेडिसन हॉटेलसमोर बुधवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शांताबाई साहेबराव सोनवणे (वय-६१) आणि नयन रमेश मोकळे (वय ११) या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी होंडा सिटी कार क्रमांक एमएच १२ एलडी १०११ च्या चालकाविरोधात बेदरकारपणे गाडी चालवून अपघात घडवल्याचा आणि दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर चंदनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील गंभीर जखमी शांताबाई सोनवणे व नयन मोकळे यांना नंतर उपचारासाठी कमांड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले . मात्र उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले .याच अपघातात कराड येथील चाळीस वर्षीय इसम देखील जखमी झाला असुन त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

Nashik, Girl died falling into bucket,
नाशिक : पाण्याच्या बादलीत पडून बालिकेचा मृत्यू
Mohammed Abdul Arfath found dead in US
अमेरिकेत मुलाचा मृत्यू, डोक्यावर ४३ लाखांचे शैक्षणिक कर्ज; भारतीय विद्यार्थ्याच्या कुटुंबाची करुण कहाणी
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
Loksatta chavdi happening in Maharashtra politics news on Maharashtra political crisis
चावडी: नाना अन् तात्याचे पारावर उपोषण!

होंडा सिटी कार रेडिसन हॉटेल कडुन टस्कन सोसायटी, खराडीकडे निघाली होती. यावेळी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याने रस्त्यावरील दोन ते तीन वाहनांना धडक दिली . याचवेळी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या शांताबाई सोनवणे व नयन मोकळे या आजी नातवाला देखील या चालकाने घडविले .  या अपघातात या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला .