05 December 2019

News Flash

पत्नीचा प्रियकर घरी पोहोचला, संतापलेल्या पतीने केली हत्या

अशोक हा वाहनचालक म्हणून काम करायचा. अशोक हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. अशोकचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते.

संग्रहित छायाचित्र

पिंपरी- चिंचवडमध्ये अनैतिक संबंधातून एका तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अशोक बिरादर (वय ३२) असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. पत्नीच्या प्रियकराला घरात बघून पती चिडला आणि त्याने संतापाच्या भरात पत्नीच्या प्रियकराची हत्या केली.

अशोक हा वाहनचालक म्हणून काम करायचा. अशोक हा विवाहित असून त्याला एक मुलगा आहे. अशोकचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. संबंधित महिला देखील विवाहित असून तिला दोन मुलं आहेत. महिलेच्या पतीला या अनैतिक संबंधाची माहिती होती. त्याने या संबंधांना विरोध दर्शवला होता. पत्नी आणि तिच्या प्रियकराला पतीने समजावलेही होते. मात्र, यानंतरही दोघांनी संबंध तोडले नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून अशोक घरी येऊन पत्नीला भेटत असल्याचे पतीला समजले होते. अखेर त्याने पत्नीवर पाळत ठेवली. मंगळवारी संध्याकाळी तिचा प्रियकर घरी येताच पती देखील घरी गेला. यानंतर त्याने पत्नी आणि प्रियकराशी वाद घातला. संतापलेल्या पतीने रागाच्या भरात अशोकवर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या अशोकचा मृत्यू झाला.

First Published on April 17, 2019 2:45 pm

Web Title: husband kills wife paramour at pimpri chinchwad
Just Now!
X