01 October 2020

News Flash

दोन दिवसांत धरणांत तीन टीएमसी पाणीसाठा वाढला

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.

संग्रहित छायाचित्र

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पडणाऱ्या दमदार पावसामुळे अवघ्या दोन दिवसांत ३.१७ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा वाढला आहे. सध्या चारही धरणांत १२.९९ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सोमवारी (३ ऑगस्ट) रात्रीपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. संततधार कोसळणारा पाऊस बुधवारी रात्रीपर्यंत कायम होता. परिणामी ३.१७ टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात १७० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात १६५ मि.मी., पानशेत धरण परिसरात १७७ मि.मी. आणि खडकवासला धरण क्षेत्रात ६८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर, बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत टेमघर धरणात ४० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणात अनुक्रमे ५५ आणि ५४ मि.मी., तर खडकवासला धरणात १२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सोमवापर्यंत चारही धरणांत ९.८२ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. हा पाणीसाठा बुधवारी सायंकाळपर्यंत १२.९९ टीएमसी म्हणजेच ४४.५६ टक्के  एवढा झाला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात १०३ मि.मी. पाऊस झाल्याने या धरणात ३.२९ टीएमसी पाणीसाठा आहे. अन्य महत्त्वाच्या धरणांपैकी गुंजवणी, नीरा देवघर, भामा आसखेड आणि भाटघर धरणांच्या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. गुंजवणी धरण परिसरात १५९ मि.मी., नीरा देवघर धरणात १६२ मि.मी., भामा आसखेड धरणात ५० मि.मी. आणि भाटघर धरणात ९० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. चासकमान धरणात ३७ मि.मी., तर डिंभे धरणात १६ मि.मी. पाऊस पडला. विसापूर धरण क्षेत्रात पावसाने दडी मारली असून घोड, येडगाव, माणिकडोह धरणांच्या क्षेत्रात तुरळक पाऊस पडला. उजनी धरण परिसरात दिवसभरात एक मि.मी. पावसाची नोंद झाली.

खडकवासला धरणातून आज विसर्गाची शक्यता

धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. संततधार पाऊस सुरूच राहिल्यास खडकवासला धरणातून गुरुवारी (६ ऑगस्ट) मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दोन दिवसांत वाढलेला पाणीसाठा टीएमसीमध्ये

धरण                     दोन दिवसांपूर्वीचा पाणीसाठा    सध्याचा पाणीसाठा

टेमघर                   ०.७५ (२०.१२)                             ०.९६ (२५.८६)

वरसगाव               ४.१८ (३२.५८)                              ५.३७ (४१.८८)

पानशेत                 ४.२४ (३९.७८)                              ५.४५ (५१.१७)

खडकवासला         ०.६६ (३३.२१)                              १.२१ (६१.५१)

एकूण                   ९.८२ (३३.६७)                               १२.९९ (४४.५६)

(कं सात टक्के वारी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 12:38 am

Web Title: in two days water storage in khadakwasla dam project increased by three tmc zws 70
Next Stories
1 शहरातील मॉलमध्ये अत्यल्प गर्दी
2 टाळेबंदीतही पुणे बाजार समितीच्या उत्पन्नात साडेदहा कोटींची वाढ
3 पावसाचा धुमाकूळ सुरूच
Just Now!
X