पिंपरी चिंचवडमधील रहाटणीमध्ये एका २४ वर्षीय तरुणांने राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. निनाद पाटील असं या तरुणांचं नाव असून आत्महत्येस कोणाला जबाबदार धरू नये, अशा आशयाची सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. निनाद हिंजवडीमधील इन्फोसिस कंपनीमध्ये काम करत होता. वर्धमान हाईट्स नावाच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या निनादने आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवले. सुसाईड नोटमध्ये त्याने कोणालाही आत्महत्येस जबाबदार धरु नये, असा उल्लेख केला आहे. याव्यतिरिक्त कोणतीही माहिती समोर आली नसल्यामुळे आत्महत्त्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.