यंदाच्या उन्हाळ्यात आंतरराष्ट्रीय बाजारात ‘प्रीमियम आइस्क्रीम’ म्हणून ओळखले जाणारे आइस्क्रीम खाण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या ‘मॅग्नम’ या ब्रॅण्डचे ‘आइस्क्रीम ऑन स्टिक’ म्हणजेच आपल्याकडचे कॅण्डी आइस्क्रीम पुणेकरांसाठी १ मार्चपासून उपलब्ध होणार आहे.
पुण्यातील मॅग्नमच्या अनावरणाच्या निमित्ताने शेफ कुणाल कपूर यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले होते. ‘मॅग्नम’ बॅ्रण्डच्या चॉकलेट आइस्क्रीममध्ये ३० टक्के शुद्ध चॉकलेट वापरण्यात येते. तसेच ते तयार करताना बेल्जियन चॉकलेटचा वापर केला जातो, त्यामुळे त्याची किंमत थोडी जास्त आहे, असे कपूर यांनी या वेळी सांगितले. पुण्यामध्ये हे आइस्क्रीम ‘क्लासिक’, ‘ट्रफल’ आणि ‘ऑलमंड’ या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध होणार आहे. भारतातील ग्राहकांच्या चवीचा विचार करुन येथील आइस्क्रीममध्ये दुधाचे प्रमाण तुलनेने जास्त आहे, असेही त्यांनी सांगितले. पुण्याबरोबरच मुंबई, हैद्राबाद आणि बेंगलोर येथेही १ मार्चपासून मॅग्नम आइस्क्रीम उपलब्ध होणार आहे.