इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा गाजत असताना देशभरातील सट्टेबाजांचा व्यवसायही तेजीत सुरू आहे. पुणे-मुंबईतील सट्टेबाजारात आयपीएलमधील प्रत्येक सामन्यावर लाखो रुपयांचा सट्टा खेळला जात आहे. पोलिसांनी मात्र या सट्टेबाजांवर कारवाई न करता या विषयात सोयीस्कर मौन बाळगले आहे.
आयपीएल स्पर्धेमुळे क्रिकेटविश्वाचे रूप पालटले. या स्पर्धेच्या निमित्ताने कोटय़वधी रुपयांचे अर्थकारण क्रिकेटविश्वात होते. घोडय़ांच्या शर्यतीवर खेळल्या जाणाऱ्या जुगाराला अधिकृत मान्यता आहे. आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यानंतर देशभरातील सटोडियांनी सट्टा सुरू केला. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यावर आणि धावेवर सट्टा घेतला जातो. आयपीएल स्पर्धेवर खेळल्या जाणाऱ्या सट्टय़ातून देशभरात कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. देशातील मोठय़ा शहरात आयपीएल स्पर्धेवर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांची साखळी तयार झाली आहे. मोबाइल, संगणकाच्या माध्यमातून ते एकमेकांशी जोडलेले असतात. एवढेच नव्हे तर व्हॉट्स अॅपच्या माध्यमाचा प्रभावी वापर सट्टेबाज करतात.
आयपीएल स्पर्धेवर खेळल्या जाणाऱ्या सट्टय़ावर पोलिसांची नजर असते. अनेक सट्टेबाज एखाद्या उच्चभ्रू सोसायटीतील सदनिकेत किंवा महामार्गावरच्या हॉटेलमध्ये बसून सट्टा घेत असतात. प्रत्येक सामन्यानुसार सट्टय़ा भाव ठरतो. एक रुपयांना दहा रुपये असा भाव असतो. काही सामन्यांमध्ये कमकुवत संघावर सट्टा खेळल्यास तो संघ विजयी झाल्यानंतर एका रुपयांवर पन्नास ते शंभर रुपये असा भाव देण्यात आला आहे. सट्टा खेळणारे प्रामुख्याने क्रिकेटप्रेमी आणि सधन वर्गातील आहे. सट्टा खेळणारा आणि सट्टा घेणारा सट्टेबाज यांच्यातील सर्व व्यवहार मोबाइलच्या माध्यमातून होत असतो. सट्टा घेणाऱ्याला ‘बुकी’ म्हणतात. बुकीला प्रत्यक्ष न भेटता सर्व व्यवहार केवळ विश्वासावर केले जातात. ज्या ठिकाणी सट्टा घेतला जातो तेथे दूरचित्रवाहिनी संच आणि दहा ते पंधरा मोबाइल संच असतात. सामन्यातील प्रत्येक चेंडू, धावा, चौकार आणि षटकारांवर सट्टा खेळला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली. पुणे शहरात आयपीएल स्पर्धेवर सट्टा घेणारे बुकी आहेत. सट्टा घेणारे बुकी त्यांचे काम करत असले, तरी पोलिसांनी मात्र त्यांच्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे.

पिंपरीतही सट्टेबाजांचा सुळसुळाट
पिंपरी बाजारपेठेत आयपीएल स्पर्धेवर मोठय़ा प्रमाणावर सट्टा खेळला जातो. पिंपरी बाजारपेठेत दबदबा असलेल्या एका राजकीय घराण्याचे सट्टेबाजारात देखील वर्चस्व आहे. आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यानंतर दरवर्षी पोलीस तेथे छापा टाकून सट्टेबाजांना पकडतात. सट्टेबाजांना पकडल्यानंतर त्यांच्यावर जुजबी कारवाई केली जाते. त्यानंतर लगेचच न्यायालयाकडून जामीन मिळवून सट्टेबाज पुन्हा सक्रिय होतात. यंदाच्या वर्षी पिंपरीत पोलिसांनी कारवाई केलेली नाही. त्यामागचे गुपित समजू शकले नाही.

Ian Bishop on Jasprit Bumrah Fast Bowling PhD
PBKS vs MI : ‘बुमराहला पीएचडी देईन आणि युवा गोलंदाजांसाठी त्याची लेक्चर्स ठेवेन’, वेस्ट इंडिजच्या माजी खेळाडूचं वक्तव्य
Crime Branch raid on Betting on IPL Cricket Match in Kothrud
कोथरुडमध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा; गुन्हे शाखेचा छापा, दहा सट्टेबाज अटकेत
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Virat Kohli
सातत्यपूर्ण कामगिरीचा बंगळूरु, कोलकाताचा प्रयत्न; ‘आयपीएल’मध्ये आज आमनेसामने