भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रिफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा बंदी करण्यात आली आहे. आज मुंबईत पोलिसांनी स्थानबद्द ४ तास केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, किरीट सोमय्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला रवाना झाले आहेत. मुंबईतील CSMT स्थानकावर पोलीस आणि त्यांच्यात बराचवेळ राडा झाला. रेल्वेस्थानकावर पोलिसांचा मोठ्याप्रमाणावर फौजफाटा होता. ज्यांनी किरीट सोमय्या यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तर, सोमय्या यांनी आक्रमक भूमिका घेत, पोलिसांना तुम्ही मला अडवू शकत नाहीत, माझ्यावरील कारवाई बेकायदेशीर आहे असं म्हणत कोल्हापूरला जाणारचं असं सांगितलं. यानंतर बराचवेळ सोमय्या हे पोलिसांचा गराड्यातच अडकले होते. मात्र ते आता महालक्ष्मी एक्स्प्रेसने प्रवास करत आहेत. दरम्यान प्रवासादरम्यान पोलीस त्यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

यावेळी किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर तिखट शब्दात टीका केली आहे. त्यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना थेट आवाहन दिले आहे. कोल्हापुरात येतोय मला रोखून दाखवा, असे सोमय्या म्हणाले. दरम्यान या प्रकरणावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार म्हणाले, या प्रकरणाची मला माहिती नाही. या प्रकरणी मुंबईला गेल्यानंतर माहिती घेऊन सांगतो.  पुण्यातील बालेवाडी भागात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सागर बालवडकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ते टीव्ही नाईन मराठी सोबत बोलत होते.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
bhavana gawali lok sabha marathi news
भावना गवळींची नाराजी मिटली? उद्योगमंत्र्यांनंतर मुख्यमंत्र्यांनीही….
bhavana gawali
“भावना गवळी यांना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामे देणार,” शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा
Congress Kolhapur
काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

लोकांचे लक्ष दुसरीकडून डायव्हर्ट करण्यापेक्षा…

अजित पवार म्हणाले, “मी ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होतो.  मी विकास कामाला महत्त्व देतो आम्ही सकाळी सहाला कामाला सुरुवात करतो आणि विकास कामाला महत्त्व देतो लोकांच्या कामाला आणि अडीअडचणीला महत्त्व देतो. लोकांचे लक्ष वेगळ्या कारणाने दुसरीकडून डायव्हर्ट करण्यापेक्षा लोकांचे प्रश्न काय आहेत ते पहा. करोना संदर्भात आपली काय लाईन ऑफ ॲक्शन आहे ती माहिती घेतली पाहिजे आणि इतर अडचणी सोडवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.”