19 September 2020

News Flash

पोलिसांच्या खांद्यावर चमकणार एलईडी इंडिकेटर?

सध्या लोणावळा पोलीस याचे प्रत्यक्षिक घेत आहेत

पोलीस हे रात्री अपरात्री कर्तव्यावर असतात तेव्हा दुरून पोलीस दिसावेत म्हणून लोणावळ्याच्या पोलीस ठाण्यात एक प्रात्यक्षिक घेण्यात आले. पोलिसांच्या खांद्यांवर चमकणारे एलईडी इंडिकेटर दिसणार आहे. त्यामुळे दूर उभे असलेले पोलीस  दिसू शकणार आहेत. ड्युटीवर असलेल्या पोलिसांना या लाईट्सचा मोठा उपयोग होऊ शकतो.  लोणावळा परिसरात मोठ्या प्रमाणावर धुकं आणि मुसळधार पाऊस असतो अशा ठिकाणी आणि रात्रीच्या वेळी या लाईट्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. अशाच पद्धतीचे चमकणारे इंडिकेटर हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खांद्यावर प्रायोगिक तत्वावर दिसू शकतात कारण पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन असा विचार करत आहेत. बॅटरीवर चालणारे हे एलईडी इंडिकेटर असणार आहे.

सविस्तर माहिती अशी की, लोणावळा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर एलईडी इंडिकेटर दिसत आहेत. पण ते प्रात्यक्षिक असल्याचे सांगण्यात येत असून रात्रीच्या वेळी अनेकदा पोलीस हे चौकात उभे असतात तेव्हा ते दिसत नाहीत, अशावेळी अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एलईडी इंडिकेटर चे सध्या लोणावळा शहरात प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. एलईडी इंडिकेटर हे पोलिसांची सुरक्षा करणार हे नक्की आहे. दरम्यान, गुजरातमध्ये ही प्रायोगिक तत्वावर असे प्रात्यक्षिकं घेतल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. रात्रीच्या वेळी चमकणारे इंडिकेटर चालकांच्या मनात कारवाईची धडकी भरवत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2019 10:52 am

Web Title: led light on police shoulder scj 81
Next Stories
1 Video: विसापूर किल्ल्यावर अडकलेल्या तरुणाची पाच तासांनी सुटका
2 खंडणीखोरीमुळे परदेशी कंपन्यांचा काढता पाय – पवार
3 ७५० सोसायटय़ांना पालिकेची नोटीस
Just Now!
X