गुंतवणूक नेमकी कुठे व किती करायची? जास्त व सुरक्षित परतावा कुठे मिळेल, यांसह गुंतवणुकीतील विविध प्रश्नांची उत्तरे देणारा आणि गुंतवणुकीचे सुयोग्य गणित जुळवून देणारा ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ उपक्रम बुधवारी (१७ फेब्रुवारी) पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. आर्थिक गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञ या उपक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
‘दिशा डायरेक्ट’ प्रस्तुत आणि न्यू इंडिया अॅश्युरन्स कं. लि.चे प्रायोजकत्व असलेल्या या उपक्रमाचे पुण्यातील मार्गदर्शन सत्र टिळक स्मारक मंदिर येथे संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून सुरू होणार आहे. यामध्ये ‘कुटुंबाचे वित्तीय नियोजन’ या विषयावर भरत फाटक मार्गदर्शन करणार आहेत. राजेंद्र वर्तक हे ‘शेअर बाजार गुंतवणुकीचे तंत्र आणि मंत्र’ उलगडून सांगतील. प्रत्येकासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या ‘निवृत्तिपश्चात जीवनासाठी नियोजनाची तयारी’ या विषयावर प्रसाद प्रधान मार्गदर्शन करणार आहेत.
सर्वसामान्यांना गुंतवणुकीविषयी असलेल्या विविध प्रश्नांना सोप्या भाषेतील उत्तरांसह सुबोध उदाहरणांच्या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे. कार्यक्रम सर्वासाठी विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल. काही जागा निमंत्रितांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

कधी?
बुधवार, १७ फेब्रुवारी, सायंकाळी ५. ३०
कुठे?
टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ, टिळक रस्ता