15 September 2019

News Flash

आठ वर्षांच्या मुलीचा खून करून पित्याची आत्महत्या

धनकवडी भागातील घटना

(संग्रहित छायाचित्र)

धनकवडी भागातील घटना

धनकवडी भागात आठ वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून करून पित्याने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

श्रद्धा आशिष भोंगळे (वय ८, रा. काशिनाथ पाटीलनगर, धनकवडी) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. तिचा खून करून आशिष भोंगळे (वय ४९) यांने गळफास घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष चालक होता. कौटुंबिक वादामुळे त्याची पत्नी नांदत नाही. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुले आणि आईसह भोंगळे धनकवडीतील काशिनाथ पाटीलनगरमध्ये राहायला आहेत. शनिवारी संध्याकाळी आशिषची आई कामानिमित्त बाहेर पडली. श्रद्धा आणि आशिष घरात होते. आशिषने श्रद्धाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर साडी पंख्याला बांधून गळफास घेतला.

आशिषची आई घरी आल्यानंतर श्रद्धा बेशुद्धावस्थेत पडल्याचे निदर्शनास आले. आशिषने गळफास घेतला होता. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रद्धाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले. रविवारी रात्री या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी घटनास्थळी भेट दिली. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

First Published on August 19, 2019 2:53 am

Web Title: loksatta crime news mpg 94 2