05 March 2021

News Flash

बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादातून मित्राचा केला खून, आरोपी जेरबंद

एमआयडीसी भोसरी पोलिसांची कारवाई

प्रातिनिधीक छायाचित्र

बिर्याणी खाण्यावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपी मित्राला जेरबंद केले आहे. विनोद मधुकर शिंदे (वय- ३२) असे खून करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून मनोहर शिवाजी कांबळे (वय- ३५) असे आरोपीचे नाव आहे. दोघे ही भंगार गोळा करून उदरनिर्वाह करायचे. दरम्यान, पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपी हा टक्कल आणि दाढी वाढवून शहरात फिरत असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोशी कचरा डेपोमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. संबंधित व्यक्ती हा बेपत्ता आहे का अशा आशयाचा मेसेज व्हाट्स ऍपवर व्हायरल करण्यात आला. मयत व्यक्तीची ओळख पटते का याचा प्रयत्न पोलीस कर्मचारी करत होते. मात्र पोलिसांना यात यश लाभलं नाही. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंठे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दौंडकर, पोटे यांनी मृत्यू झालेल्या विनोद यांच्या नातेवाईकांचा शोध लावला. यावेळी ९ जुलै रोजी मयत विनोद हा मनोहर याच्या सोबत घराबाहेर पडल्याचे समजले.

मनोहर विषयी माहिती समजताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपीला ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. खुनाच्या काही दिवस अगोदर एक व्यक्तीने उरलेली बिर्याणी मयत विनोद आणि आरोपी मनोहरला खायला दिली होती. यावरून त्यांच्यात भांडण झाले होते. मयत विनोदने त्यावेळी आरोपीच्या खांद्याला कडाडून चावा घेतला होता. त्याचाच राग मनोहरच्या मनात होता. ९ जुलै रोजी भंगार गोळा करत असताना विनोद हा मोठ्या कचरा कुंडीत उतरला. त्याच वेळी आरोपी मनोहरने वरून डोक्यात दगड घातला, ज्यामध्ये विनोदचा जागीच मृत्यू झाला होता. यानंतर आरोपी मनोहरने तात्काळ घटनास्थळावरु पोबारा केला. दरम्यान कचरा उलण्यात येत असताना विनोदचा मृतदेह तसाच मुख्य कचरा डेपो मोशी येथे गेला आणि ही घटना समोर आली. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मनोहरला अटक केली असून त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2020 8:35 pm

Web Title: man killed his friend in pimpri chinchwad over spat between biryani gets arrested kjp 91 psd 91
Next Stories
1 पुण्यात उद्यापासून लॉकडाउन नाही पण निर्बंध कायम
2 जेजुरीत आरोग्य सेवा संघाकडून मधुमेही रुग्णांना मोफत औषधांचे वाटप
3 पंधरा दिवसांच्या वासराला बेदम मारहाण; मालकविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X