News Flash

तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्याला १२ वर्षांची शिक्षा

पिंपरीत २०१५ ला तीन वर्षीय चिमुकली सोबत आरोपीने केले होते लैंगिक चाळे

प्रतिकात्मक छायाचित्र

पिंपरीत तीन वर्षांच्या चिमुकली बरोबर लौंगिक चाळे करणाऱ्या नराधमाला शिवाजी नगर कोर्टाने १२ वर्षे कारावास आणि १५ हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही घटना सप्टेंबर २०१५ ला पिंपरीत घडली होती. संजय बाबू गायकवाड असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्ना सावंत यांनी केला होता.

पिंपरीत ३ सप्टेंबर २०१५ ला तीन वर्षीय चिमुकली राहत्या घराच्या बाहेर खेळत होती. तेव्हा नराधम संजयने तिच्यासोबत लैंगिक चाळे केले होते. दरम्यान, संबंधित तीन वर्षीय पीडित चिमुकली घरी आईकडे आल्यानंतर धक्कादायक घटना उघड झाली होती. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार, तात्काळ सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्ना सावंत यांनी आरोपी संजय बाबू गायकवाड याला अटक करून जेरबंद केले होते. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी झाली होती, जामीनही झाला नव्हता.आत्तापर्यंत तो कारागृहातच होता. त्यानंतर आज जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश शिवाजी नगर कोर्ट श्रीमती आर.व्ही आदोने यांनी संबंधित आरोपीला १२ वर्ष कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्ना सावंत यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 11:17 pm

Web Title: man sentenced to 12 years jail for sexual harassment of three year old girl scj 81 kjp 91
Next Stories
1 पुणे शहरात करोनाचे ५२८ नवे रुग्ण, पिंपरीत १० जणांचा मृत्यू
2 धक्कादायक: पुण्यात तेरा दिवसांच्या बाळाला आई वडिलांनीच पुरले
3 सक्ती नसलेल्या ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅपची उपाहारगृहांकडून अंमलबजावणी
Just Now!
X