लिफ्ट दिल्यानंतर अश्लील चाळे केल्या प्रकरणी तरूणीने तरुणांकडे दहा हजारांची मागणी केली. पैशांवरून दोघात वाद झाला, त्या दरम्यान इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तरुणाने तरुणीस ढकलून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत त्या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  आश्रफ सय्यद (वय 20) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशन परिसरामधून रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी आश्रफ सय्यद हा जात असताना.त्यावेळी एका तरुणीने हात दाखवून लिफ्ट मागितली. रात्रीच्या वेळ असल्याने असल्याने, आरोपी तरुणाने तिला लिफ्ट दिली. काही वेळानंतर तिने खडकीमध्ये सोडा असे, तरुणीने आरोपीला सांगितले. पण तो तिला मध्येच सोडू लागला. त्यावर तिने येरवडा परिसरात सोडण्याचा हट्ट धरला. त्यानंतर तो त्या तरुणीला कोरेगाव पार्क येथील बहिणीच्या घरी गेला आणि इमारतीच्या टेरेसवर घेऊन गेला.

यानंतर दोघांमध्ये अश्लील चाळे झाले. या सगळ्या प्रकारानंतर तरुणीने आरोपीकडे दहा हजार रूपयांची मागणी केली. या पैशांवरुन दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने तरुणीला तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिले. यामध्ये त्या तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपीने होळकर ब्रिजखाली या तरुणीचा मृतदेह फेकला. या घटनेतील आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून तपास करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर या प्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून, तो कोरेगाव पार्क पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.