पिंपरी-चिंचवडमधील ११ करोना मुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापैकी, आज एका वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणाला घरी सोडण्यात आल आहे. तो फिलिपिन्स येथे वैद्यकीय शिक्षण घेत होता. आज डिस्चार्ज देण्याअगोदर तरुणाने नागरिकांना आवाहन केलं असून नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून घराबाहेर निघू नये असं म्हणाला आहे. त्याच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉ. विनायक पाटील यांनी अथक प्रयत्न करत करोना बाधितांना बरे करत आहेत. संबंधित तरुणाला न्यूमोनिया आणि करोना विषाणूची बाधा होती मात्र डॉक्टरांनी त्याला वाचवल असंच म्हणावं लागेल.

पिंपरी-चिंचवड शहरात सध्या दोन करोना बाधितांची भर पडली असून ते दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतले आहेत. त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या ही १४ वर पोहचली असून पैकी ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. त्यांची प्रकृती ठणठणीत असून ते बरे झाले आहेत. त्यातील एकाला डिस्चार्ज देण्यात आला असून तो तरुण फिलिपिन्स येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. शहरात आल्यानंतर त्याला त्रास जाणवत होता त्यामुळे नॉर्मल तपासणी केली असता तो करोना बाधित असल्याचा अहवाल आला. दरम्यान, त्याच्यामुळे भावाला देखील करोना झाला असून पहिली टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. तर त्याची बहीण आणि आई वडिलांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तरुणाच्या १४ दिवसानंतर दोन्ही टेस्ट चा अहवाल हा निगेटिव्ह आल्यानंतर त्याला आज घरी सोडण्यात आले.

नागरिकांनी गर्दीमध्ये जाऊ नये तसेच गर्दी करू नका असे आवाहन करोना मुक्त तरुणाने केले आहे. घराबाहेर देखील जाऊ नका अस त्याच म्हणणं असून प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे अस ही तो म्हणाला आहे. यामुळे करोना विषाणू चा प्रादुर्भाव कमी होईल असं तो म्हणाला आहे.