पुरंदर तालुक्यातील भिवरी येथील श्री कानिफनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
या पुरस्काराचे स्वरूप रोख २५ हजार रुपये, चांदीचे मानचिन्ह, सन्मानपत्र असे आहे. पुरस्कार वितरण समारंभास मानव संसाधन विकास मंत्री पल्लम राजू यांच्यासह इतर मंत्री व उच्चपदस्थ उपस्थित होते. मेमाणे यांनी गेल्या ३२ वर्षांमध्ये विद्यार्थी गळतीचे प्रमाण कमी करणे, दत्तक पालक योजना, वृक्ष लागवड आणि जोपासना, पर्यावरण सेवा योजना, वनराई बंधारे, देणगीदारांच्या माध्यमातून वर्ग खोल्या बांधणे, गुणवत्ता वाढ अभियान, वाचन चळवळ, गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य यांसारखे अनेक उपक्रम राबवले आहेत.