News Flash

बारामतीत कवी मोरोपंत स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात

मराठी भाषेला आपल्या काव्य संपदेने अजरामर करणारे कवी मोरोपंत पराडकर यांच्या बारामती येथील स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्या रूपाने एक ऐतिहासिक वास्तू

| January 2, 2015 03:00 am

मराठी भाषेला आपल्या काव्य संपदेने अजरामर करणारे मराठीतील कवी मोरोपंत पराडकर यांच्या बारामती येथील स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, त्या रूपाने एक ऐतिहासिक वास्तू आकार घेत आहे.
कवी मोरोपंताची जन्मभूमी ही कोल्हापूरमधील पन्हाळा ही आहे. कर्मभूमी मात्र बारामती हीच आहे. पुण्यातील पेशवेकालीन सावकार बाबुजी नाईक यांच्याकडे पेशवे काळात पुराणिक म्हणून कवी मोरोपंत यांना राजाश्रय मिळाला होता. बारामतीच्या कऱ्हा नदीच्या तीरानजीकचा एक वाडा बाबुजी नाईकांनीच कवी मोरोपंताना भेट दिला होता. या वाडयातील एका खोलीत मोरोपंतानी आपल्या काव्य संपदाचे लेखन केले होते. या जागेतच स्मारक व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार स्मारकाचे काम शेवटच्या टप्पात आले आहे.
बारामतीमध्ये कवी मोरोपंत यांच्या नावाची एक पतसंस्था, एक गृहरचना सोसायटी, बारामती नगर परिषदेचे सार्वजनिक वाचनालय आणि नव्याने बांधलेले नाटयगृह आहे. बारामतीमधील स्मारक समितीच्या वतीने प्रतीवर्षी सिध्देश्वर मंदिरात चत्रपौर्णिमेच्या दिवशी कवी मोरोपंताच्या पुण्यतिथीनिमित्त नामवंत कवी साहित्यिकांचे व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. कवी मोरोपंत पतसंस्था यांच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कवी मोरोपंताच्या स्मारकासाठी तीन कोटी रूपये मंजूर केले होते. या निधीतूनच या स्मारकाचे काम आज प्रगती पथावर आहे. हेच काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.

‘ही आनंदाची बाब’
स्मारक कमिटीच्या माध्यमातून अनेक दिवसांची मागणी पूर्ण होती आहे. कवी मोरोपंतांचे स्मारक ही बाब निश्चित गौरवास्पद असून स्मारकाबाबत फार आनंद होत आहे. स्मारकामुळे शहराच्या वैभवात भरच पडेल.
 – एम. डब्ल्यू जोशी, स्मारकाचे अध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 3:00 am

Web Title: memorial of poet moropant is in last stage
Next Stories
1 मुंबईत १४% ठाणे, वसई २०%
2 पुण्यात चालणे झाले अवघड
3 भारत आणि चीनला एकमेकांशिवाय पर्याय नाही- दलाई लामा
Just Now!
X