सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था व्यवस्थित न चालवल्यास साखरउद्योगा प्रमाणे दूध संघांना देखील खासगी उद्योगाचा धोका असल्याची शक्यता माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली. हे लक्षात घेता साठवणूक, वितरण आणि मार्केटिंग यावर दूध संघांनी विशेष काम करण्याची गरज असून यावर लक्ष दिल्यास हा व्यवसाय अधिक पुढे जाईल.असे त्यांनी सांगितले. पुण्यातील यशदा येथे ‘दुग्ध क्रांतीनंतर पुढे……’ या विषयावर लोकसत्ता मिल्क कॉनक्लेव्ह यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विषयावर माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार,राज्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नाबाबत भूमिका मांडली.यावेळी लोकसत्ता चे संपादक गिरीश कुबेर, पुणे आवृत्तीचे संपादक मुकंद संगोराम तसेच या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले की, दुधाचे उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. दूध व्यवसाय सहकार क्षेत्रात किती टिकेल याची चिंता निर्माण झाला आहे.तर शासकीय डेअरी बंद पडत आहेत.एकूणच दुग्ध व्यवसायाबाबत शासकीय स्तरावर धोरण ठरवून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून शेतकयाच्या समस्या मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,दुधासाठी म्हशीच्या तुलनेत गायी सांभाळणे परवडणारे नाही. हा माझा अनुभव असून दुधापासून तयार होणाऱ्या इतर पदार्थांतून पैसे मिळतात. शेण खताचा देखील फायदा अधिक प्रमाणात होतो.त्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

man jumps into lake after being fed up with expenses of daughters treatment
मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्याची तलावात उडी; वेळीच दोन पोलिसांनी…
mumbai, Bhabha Hospital, Nurse Assaulted, Nurse Assaulted at Bhabha Hospital, Nurses warns Strike, Nurses Safety Concerns, Bhabha Hospital nurses warns Strike, hospital news, Bhabha hospital news, nurse assaulted news,
मुंबई : परिचारिका आंदोलनाच्या पवित्र्यात, सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी कर्मचारी संघटना आक्रमक
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य

दुधापासून तयार होणारी उत्पादने फायदेशीर ठरतात.त्यासाठी त्यांची गुणवत्ता टिकाऊपणा या दृष्टीने नवीन तंत्रज्ञान आवश्यक आहे.गो वंश हत्या बंदी कायदा शेतकऱ्यासाठी अडचणीचा ठरत असून त्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. कारण भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. दुग्ध उत्पादनावरील जीएसटी कमी करण्या बाबत कोणा एकट्याला निर्णय घेता येत नाही. त्यासाठी जीएसटी कौन्सिलमध्ये निर्णय घ्यावा लागतो.त्या करिता एक प्रक्रिया आहे.मात्र हा मुद्दा सरकारकडे मांडला जाईल.

यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे म्हणाले की,दुधाची गुणवत्ता वाढली पाहिजे.यावर विशेष उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.तर हा व्यवसाय मार्केटिंगवर अवलंबून असून त्याचे मार्केटिंग चांगल्या प्रकारे झाले पाहिजे.त्यावर दूध संघांनी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.तसेच सध्याची आकडेवारी वरून ३.६० टक्कयांनी शेतीचे उत्पादन वाढले आहे. १४.३ टक्यांनी दुधाचे उत्पादन वाढले आहे. ही चांगली बाब आहे, जगाच्या दूध उत्पादनात भारताचे ६ टक्यांनी वाढ झाली आहे. दुधाचे दिवसेंदिवस उत्पादन वाढत आहे. त्याचे प्रत्येकाने वापर केला पाहिजे.ते शरीराच्या दृष्टीने अधिक चांगले आहे.पण साखरेचे उत्पादन अधिक झाले म्हणून मी साखर अधिक खा असे म्हणणार नाही.