स्‍वामी विवेकानंद म्‍हणाले होते की, कालीमातेची पुजा करतांना ताजी आणि टवटवीत फुले वापरली जातात. कोमेजलेली फुले आपण वापरत नाही. तसेच मातृभूमीच्‍या रक्षणासाठी सुदृढ तरूणाई आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

बिबवेवाडी येथे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लबच्यावतीने क्रीडा क्षेत्रातील २१ दिव्यांग व्यक्‍तींना दत्तक घेण्यात आले आहे. या कार्यक्रमा प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी ज्‍येष्‍ठ विधी तज्ज्ञ उज्‍ज्‍वल निकम, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, सुधीर कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ, मिहीर कुलकर्णी, संजय मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी मुख्‍यमंत्री फडणवीस म्हणाले की, व्यक्ती शरीराने दिव्यांग नसतो, तो मनाने असतो. जो मनाने दिव्यांग होतो तोच खरा दिव्यांग असतो. मनात उमेद, उभारी, हिंमत, ताकद असली. तर दिव्यांग व्यक्ती कुठल्याही उंचीपर्यंत जाऊ शकतात.