भोसरीतील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ. श्रध्दा बाजीराव लांडे यांनी अपेक्षेप्रमाणे महायुतीच्या सारिका कोतवाल यांचा दणदणीत पराभव केला. एकूण मतदान झालेल्या ४ हजार ९५१ पैकी ३ हजार ९८८ मते मिळवत लांडे यांनी ३ हजार २५ मतांच्या फरकाने एकतर्फी बाजी मारली. यानिमित्ताने आमदार विलास लांडे व महापौर मोहिनी लांडे यांनी भोसरीवरील राष्ट्रवादीचा प्रभाव अधोरेखित करतानाच महायुतीचा धुव्वा उडवला.
अवघे २९ टक्के मतदान झालेल्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी पालिका मुख्यालयात सुरुवात झाली. तेव्हा संपूर्ण १८ केंद्रांतील मतदानात लांडे यांनी मोठी आघाडी घेतल्याचे दिसून आले. एकाही ठिकाणी कोतवाल यांना १०० मतांचा आकडा ओलांडता आला नाही. प्रभागातील १७ हजार १०१ पैकी ४ हजार ९५१ मतदान झाले. त्यापैकी लांडेंना ३ हजार ९८८ तर कोतवालांना ९६३ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. उदय टेकाळे यांनी श्रध्दा लांडे विजयी झाल्याचे घोषित करताच आमदार लांडे, बाजीराव लांडे, महापौरांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. महिला कार्यकर्त्यांनी भंडारा उधळला. महायुतीचे नेते मतमोजणीकडे फिरकले नाहीत.
विजयी झाल्यानंतर श्रध्दा लांडे म्हणाल्या, मी राजकारणात यावे व यशस्वी व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती ती पूर्ण झाली. अजितदादा, विलास लांडे, मोहिनी लांडे यांचे आशीर्वाद, राष्ट्रवादीचे नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे मोठा विजय मिळाला. नगरसेवक म्हणून साडेतीन वर्षे मिळाली असून त्यात पाच वर्षांचे काम करायचे आहे. आपण युवा असल्याने युवकांच्या समस्यांना प्राधान्य देऊ. विलास लांडे म्हणाले, प्रभागाची निवडणूक लोकसभेची किंवा विधानसभेची रंगीत तालीम नव्हती. राजकीय भूमिका बाजूला ठेवून विकासासाठी कटिबध्द राहण्याची भूमिका घेतली, त्यास मतदारांनी प्रतिसाद दिला. पद आज आहे, उद्या नाही. काम कायम राहणार आहे, असे ते म्हणाले.

Gajanan kirtikar on Narendra Modi
‘विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणे भाजपाची नवी संस्कृती’, शिंदे गटाच्या खासदाराचा भाजपावर घणाघात
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
war Of words between amol kolhe and shivajirao adhalrao patil over shirur lok sabha constituency
शिवाजीराव आढळरावांच्या ‘राष्ट्रवादी’तील प्रवेशानंतर ‘शिरूर’मध्ये आता शब्दिक युद्ध