News Flash

पावणेतीन लाखांच्या पाळीव श्वानाची चोरी

ल्हासाअ‍ॅप्सो जातीचा तब्बल पावणे तीन लाख रुपये किमत असलेला पाळीव श्वान चोरून नेल्याप्रकरणी दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.

दोन आरोपींना अटक

पुणे : ल्हासाअ‍ॅप्सो जातीचा तब्बल पावणे तीन लाख रुपये किमत असलेला पाळीव श्वान चोरून नेल्याप्रकरणी दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी (२८ जावेवारी) ही चोरी झाली होती.

अमोल मारुती चव्हाण (वय ३५, रा. अपर इंदिरानगर), निरंजन आनंद कुलकर्णी (वय ३४, रा. रक्षलिका सोसायटी, धनकवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सचिन अ‍ॅन्थोनी (वय ३६, रा. निंबाळकरवाडी, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅन्थोनी हे पाळीव श्वानांचे प्रशिक्षक आहेत. गुजर निंबाळकरवाडी येथील एका फार्महाऊससमोरील मोकळ्या जागेत ते श्वानांना प्रशिक्षण देतात. या ठिकाणाहून अ‍ॅन्थोनी यांच्या ओळखीच्या असलेल्या दोघांनी संबंधित श्वान चोरून नेल्याची फिर्याद देण्यात आली. त्यावरून दोघांना अटक करण्यात आली असून, पुढील तपास करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 2:02 am

Web Title: pet dog theft two accused arrested akp 94
Next Stories
1 ठेकेदारांच्या गाडय़ा रोज रस्त्यातच बंद
2 उरुळी देवाची येथे शहराचे धान्य गोदाम
3 कण्हेरी-काटेवाडीत दहशत निर्माण करणारा बिबटय़ा अखेर जेरबंद
Just Now!
X