News Flash

शरीरसंबंधास नकार देणाऱ्या मैत्रिणीकडून उकळले पैसे; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

१७ वर्षांची पीडित मुलगी आणि अभिषेक नारायण शितोळे (वय १९) या दोघांची एकाच क्लासमध्ये शिकत असताना ओळख झाली होती. अभिषेकने पीडित मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली.

संग्रहित छायाचित्र

पिंपरी: शरीरसंबंधास नकार देणाऱ्या मैत्रिणीला धमकावत तिच्याकडून २५ हजार रुपये उकळणाऱ्या तरुणाविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१७ वर्षांची पीडित मुलगी आणि अभिषेक नारायण शितोळे (वय १९) या दोघांची एकाच क्लासमध्ये शिकत असताना ओळख झाली होती. अभिषेकने पीडित मुलीकडे शरीरसुखाची मागणी केली. मात्र तिने नकार दिला. यानंतर अभिषेकने तिचा छळ सुरु केला. पीडित तरुणीने अभिषेकशी मैत्री तोडली आणि बोलणेही बंद केले. मग अभिषेक तिचा पाठलाग करु लागला. त्याने पीडित मुलीला धमकी दिली आणि तिच्याकडून तब्बल २५ हजार रुपये उकळले. इतकंच नव्हे तर मंगळवारी अभिषेक व त्याच्या आई, चुलत भाऊ, चुलत बहिणीने पीडित मुलीला मारहाण केली. अखेरीस पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात अभिषेकविरोधात तक्रार दाखल केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2018 5:35 pm

Web Title: pimpri 17 year old girl threatened money extorted in sangavi
Next Stories
1 पुण्यात इंजिनीअरिंगच्या पहिल्या वर्षांचा पेपर फुटला
2 इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे पुण्यात ‘स्कूटर ढकल’ आंदोलन
3 लोणावळ्यात भीषण अपघातात तीन वर्षीय मुलीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू
Just Now!
X